संविधानानं सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था तयार केल्याचं मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधे प्रतिपादन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं  देशात समतेचं राज्य निर्माण करण्यासह, सर्वांना समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  नागपूर इथल्या डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात ते आज बोलत होते. 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वारसा पुढे नेण्याचं कार्य हे महाविद्यालयानं सातत्यानं करत असून ६ हजाराहून अधिक विद्यार्थी असलेल्या या महाविद्यालयानं हजारो वंचित विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं आहे, असं मुख्यमंत्री  म्हणाले.    

 

या कार्यक्रमाला सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई  देखील उपस्थित होते. काही खोल्यांमध्ये सुरु झालेल्या या महाविद्यालयात आज विविध शाखांचं शिक्षण दिलं जात असल्याबद्दल  न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आनंद व्यक्त केला. बाबासाहेबांनी दिलेला सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.