गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं करता यावा यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विधानभवन येथे नवीन फौजदारी संहिता कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामं श्रेणीबद्ध करावीत, असंही ते म्हणाले. नवीन फौजदारी कायद्यांमुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करता येत असल्याचं ते म्हणाले. गुन्हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांच्या चाचण्या न्यायवैद्यक विभागानं वेळेत कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. ऑनलाईन एफआयआर प्रणालीवर नागरिक सहजपणे तक्रार नोंदवू शकतील यासाठी काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गुन्हे सिद्धता वाढण्यासाठी ई न्यायालय प्रणाली सक्षम करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Site Admin | July 2, 2025 8:07 PM | Chief Minister Devendra Fadnavis
गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी नवीन फौजदारी संहिता कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक-मुख्यमंत्री
