नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभा राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मॅक्स एअरोस्पेस अँड एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राज्य शासनाच्या उद्योग विभाग यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कारखान्याचं प्रत्यक्ष काम २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये ८ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.
Site Admin | June 13, 2025 8:24 PM | Chief Minister Devendra Fadnavis
नागपूरमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभा राहणार
