डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विद्यापीठं नवोन्मेष आणि संशोधनाची केंद्र बनावीत, असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

विद्यापीठं केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था नाही तर संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रं बनावीत, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं. नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘चक्र’ या उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन आणि संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ‘चक्र’ च्या माध्यमातून संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं.

 

नागपूर- मुंबई महामार्गावरच्या ७६ किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन येत्या ५ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा ७०१ किलोमीटर लांबीच्या हाय-स्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरुन आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.