डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुख्यमंत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर असून ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी नाशिक मधल्या तीन आणि त्र्यंबकेश्वर मधल्या दहा आखाड्यांचे महंत उपस्थित राहणार आहेत. नाशिकमधल्या कुंभमेळा पर्वाच्या तारखा यावेळी घोषित केल्या जातील. यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात उभारलेल्या उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.