डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मेट्रोच्या कामापैकी ५० किमीचे टप्पे वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई मेट्रोच्या कामापैकी ५० किलोमीटरचे टप्पे या वर्षी, तर ६२ किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. तांत्रिक तपासणीनंतर मेट्रोचा हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होईल, पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडी कमी व्हायला यामुळे मदत होईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून बांद्र्यापर्यंत मेट्रोचं काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असून तो पुढे विरारपर्यंत नेला जाईल. इतर विविध मार्गांनी या मेट्रो एकमेकींशी जोडण्याचं कामही सुरू असून यामुळे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास करणं लोकांना सोयीचं होईल, असंही त्यांनी सांगितलं. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचं स्थानक असून त्याच्याशी मेट्रो जोडण्याची आखणीही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर यावेळी उपस्थित होते.