डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यात प्रत्येकाला घराजवळ दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा उभारणार

राज्यात प्रत्येकाला घरापासून जवळ दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा पुढच्या ३ ते ४ वर्षांत उभी करण्यात येणार असल्याचं मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमधे शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम युनिट या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि संस्थेच्या विस्तारित भागाचं लोकार्पण आज केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झालं, त्या कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. कर्करोगावर रेडिएशन उपचार आता छत्रपती संभाजीनगरमधे उपलब्ध होतील असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात  जिथे जिल्हा सामान्य रुग्णालयाचं रुपांतर वैद्यकीय महाविद्यालयात झालं आहे, तिथं वेगळं सामान्य रुग्णालय उभारण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. 

 

कर्करोगविषयक उपचार आणि जागृतीवर  भर देण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी दिली. निदान झाल्यावर ९० टक्के रुग्णांवर ३० दिवसात उपचार सुरु होत आहेत याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसंच स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी तसंच वरिष्ठ शासकीय अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.