राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित-मुख्यमंत्री

राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने महसूल विभागाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमासंबंधीच्या क्षेत्रीय कार्यशाळेचं कालपासून पुणे इथं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. १०० दिवसांचा कृती कार्यक्रम कार्यालयांमध्ये चांगल्या पद्धतीने सुरू असल्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. महसूल विभागाच्या हस्तपुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.