डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं-मुख्यमंत्री

नागपुरात भारती कृष्ण विद्या विहार इथं वैदिक गणिताचं गुणवत्ता केंद्र उभारलं जावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, असं आश्वासनही त्यानी दिलं. ते आज भारती कृष्ण विद्या विहार शाळेत शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या दोन खंडांच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताची महती आणि उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणं गरजेचे आहे, असं ते म्हणाले. 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते या खंडांचं प्रकाशन झालं.