डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज २१ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण केलं. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सांगितलं. सबळ पुरावे नसल्यानं किंवा पुराव्यांसोबत छेडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण या वाहनांमुळे कमी होईल, असं ते म्हणाले. 

 

राज्यात अशी एकूण २५६ फॉरेन्सिक वाहनं तयार केली जाणार आहेत. भारतीय साक्ष कायद्यानुसार गुन्ह्यातल्या पुराव्यांसाठी शास्त्रीय पद्धतीनं साक्ष तसंच पुरावे गोळा करणं बंधनकारक आहे. या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी फॉरेन्सिक वाहनांचं लोकार्पण करणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.