पुणे जमीन घोटाळ्यात कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नागपूर इथे आज वार्ताहरांशी ते बोलत होते. या प्रकरणात अनियमितता झाल्याचंही स्पष्ट झालं असून अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रकरणाची व्याप्ती आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.
प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि या संपूर्ण व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.