नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या महिला वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने चीनच्या लेई टिंगजीला १०-३ असं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दिव्याने नुकतीच जॉर्जिया इथं झालेली फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता. उपांत्य फेरीत येत्या गुरुवारी तिचा मुकाबला चीनची ग्रँडमास्टर हाउ यीफान हिच्याशी होणार आहे.
Site Admin | August 12, 2025 2:32 PM | Chess | Divya Deshmukh
जागतिक वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल
