काशी तामिळ संगममच्या तिसऱ्या टप्प्याचं वाराणसीत उद्घाटन

काशी तामिळ संगममच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज वाराणसीत नमो घाट इथं करण्यात आलं. वैद्यक शास्त्राच्या सिद्ध चिकित्सेत अगस्त्य ऋषींचं योगदान तसंच तामिळ साहित्य आणि देशाच्या सांस्कृतिक एकात्मतेतलं योगदान याबद्दल १० दिवस विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तामिळनाडू आणि कशी या देशाच्या दोन सुशिक्षित राज्यांमधल्या परस्पर प्राचीन संबंधांचा पुनर्प्रत्यय  देणं हा काशी तामिळ संगममचा मुख्य उद्देश आहे. कशी तामिळ संगममला भेट देणाऱ्या प्रतिनिधींच्या रेल्वेगाडीला  तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांनी दोन दिवसांपूर्वी चेन्नईत हिरवा झेंडा दहवून रवाना केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.