डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री उद्या जगातल्या सर्वात उंचावरच्या रेल्वे पुलाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असून, जगातला सर्वात उंचावरच्या चिनाब रेल्वे पुलाचं ते उद्घाटन करणार आहेत. स्थापत्यशास्त्रातलं आश्चर्य ठरेल असा चिनाब रेल्वे पूल नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर आहे, हा एक हजार ३१५ मीटर लांबीचा पूल पोलादी कमानीवर तोललेला आहे. भूकंप आणि सोसाट्याच्या वाऱ्यांना तोंड देण्याच्या दृष्टीने सक्षम केलेला आहे. या पुलामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्क आता वाढू शकेल. त्याचबरोबर अंजी या देशातल्या पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचं उद्घाटन, तसंच कटरा इथं ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा