मुसळधार पावसामुळे उत्तराखंड मधल्या चार धाम यात्रेवर टाकण्यात आलेले तात्पुरते निर्बंध काढण्यात आले असल्याची माहिती गढवालचे आयुक्त विनय पांडे यांनी दिली आहे. त्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांना यात्रा मार्गांवर हवामानाच्या परिस्थितीनुसार वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दोन दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातल्या प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यात्रेच्या मार्गावरील ढिगारे साफ करण्यासाठी यंत्रे आणि कामगार घटनास्थळी कार्यरत असले तरी सतत होणाऱ्या पावसामुळे रस्ते पुन्हा सुरू करण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.
दरम्यान, राज्याच्या विविध भागांमध्ये हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा दिला असून यात्रेकरू आणि स्थानिक रहिवाशांना सावध राहण्यास सांगितलं आहे.