चारधाम यात्रा आणि हेमकुंड साहीब यात्रेसाठी नोंदणी केलेल्या ७७ पाकिस्तानी नागरिकांची नोंदणी उत्तराखंड सरकारनं रद्द केली आहे. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सतपाल महाराज यांनी काल ही घोषणा केली.
दहशतवाद आणि पर्यटन हातात हात घालून जाऊ शकत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार सर्व भाविकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी कटीबद्ध असल्याचंही ते म्हणाले. चारधाम यात्रेसाठी २२ लाख भाविकांनी नोंदणी केली असून यात इतर देशातल्या २५ हजार भाविकांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.