उत्तराखंड इथल्या यंदाच्या चारधाम यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू होत आहे. यावर्षी, यात्रेसाठीची नोंदणी आधार प्रमाणित केली जाणार असून, नोंदणी दरम्यान भाविकांना त्यांच्या आधार कार्डचे तपशील द्यावे लागतील.
यात्रेकरूंच्या सोयीसाठी एकूण नोंदणीपैकी ६० टक्के नोंदणी ऑनलाईन माध्यमातून होईल, तर ४० टक्के ऑफलाईन असेल. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हरिद्वार आणि ऋषिकेश सह यात्रेच्या मार्गावर नोंदणी केंद्रांची संख्या वाढवली जाईल. भाविकांच्या सोयीसाठी, पर्यटन विभागाने यावर्षी प्रवासाच्या ४० दिवस आधीच ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.