खेळ

November 20, 2025 11:25 AM November 20, 2025 11:25 AM

views 19

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.   सिडनी इथं काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या सु ली-यांगचा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं इंडोनेशियाच्या मार्सेलीनोचा पराभव केला.  

November 20, 2025 10:11 AM November 20, 2025 10:11 AM

views 24

मुकबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या मूकबधीरांच्या 25 व्या ऑलिंपिक स्पर्धेत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या भारतीय नेमबाज जोडीनं 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.   अंतिम लढतीत त्यांनी चिनी तैपाईच्या जोडीला 16-6 असं पराभूत केलं. तर, कुशाग्र सिंग राजावतनं 50 मीटर रायफल प्रोन स्पर्...

November 19, 2025 2:56 PM November 19, 2025 2:56 PM

views 15

जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची उत्तम कामगिरी

ग्रेटर नोएडा इथे शहीद विजय सिंह पाठक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा २०२५ मध्ये महिलांच्या गटात भारताच्या अरुंधती चौधरी हिनं जर्मनीच्या लिओनी मुलर हिला पराभूत केलं. तर मिनाक्षी, अंकुश फांगळ, प्रवीण आणि नुपूर यांनी त्यांच्या गटात उत्तम कामगिरीची नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

November 19, 2025 9:41 AM November 19, 2025 9:41 AM

views 23

मूकबधीरांच्या ऑलिंपिक्समध्ये 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दुहेरी कामगिरी

टोकियोमध्ये सुरु असलेल्या 25 व्या डेफलिंपिक म्हणजे मूकबधीरांच्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय नेमबाजांनी काल 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि कास्यपदक जिंकून दुहेरी कामगिरी केली.   धनुष श्रीकांत आणि महित संधू यांच्या जोडीनं सुवर्णपदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीचा 17-7 असा पर...

November 18, 2025 7:23 PM November 18, 2025 7:23 PM

views 15

टेनिसपटू कार्लोस अल्काराजची दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार

जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित टेनिसपटू कार्लोस अल्काराज यानं दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. आज त्यानं समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेवेळी त्याच्या दुखापतीनं आणखी गंभीर स्वरूप धारण केलं. या स्पर्धेत यानिक सिनर यानं त्याच...

November 18, 2025 10:02 AM November 18, 2025 10:02 AM

views 34

जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा गुरप्रित सिंग याला रौप्य पदक

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिंपिकपटू गुरप्रित सिंग यानं पुरुषांच्या 25 मीटर पिस्तुल गटात रौप्य पदक पटकावलं. जागतिक स्पर्धेतलं गुरप्रितचं हे दुसरं रौप्यपदक आहे.   त्यानं 2008 मध्ये 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तुल गटात रौप्यपदक मिळवलं होतं. इजिप्तमधील जागतिक स्...

November 16, 2025 7:19 PM November 16, 2025 7:19 PM

views 24

भारताच्या धनुश श्रीकांतला एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक

  श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या डेफलिंपिक्स २०२५ स्पर्धेत भारताच्या धनुश श्रीकांत यानं एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं २५२ पूर्णांक २ दशांश गुण नोंदवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. भारताचाच मोहम्मद वनिया यानं २५० पूर्णांक १ दशांश गुण मिळव...

November 16, 2025 6:32 PM November 16, 2025 6:32 PM

views 23

जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीत धडक

ग्रेटर नॉयडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या चारही स्पर्धकांनी उपांत्य फेरीत धडक मारली. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीनाक्षी हिनं, तर ५८ किलो वजनी गटात प्रीती यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. पुरुषांच्या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात अंकुश आणि...

November 16, 2025 4:20 PM November 16, 2025 4:20 PM

views 15

टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकित कार्लोस अल्काराजसमोर यानिक सिनर याचं आव्हान

टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत आज अग्रमानांकित कार्लोस अल्काराज याच्यासमोर यानिक सिनर याचं आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा सामना ट्युरिन इथं सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कार्लोस अल्काराज यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-२, ६-४ अशी मात केली होती, ...

November 16, 2025 3:47 PM November 16, 2025 3:47 PM

views 82

कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव

कोलकाता इथं झालेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर ३० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या ७ बाद ९३ धावांवरून पुढे सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन या...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.