खेळ

June 6, 2025 3:45 PM

views 19

नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत भारताचा डी. गुकेश विजयी

भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशनं नॉर्वे बुद्धीबळ स्पर्धेत आपला चौथा विजय मिळवला. गुकेशनं क्लासिकल स्पर्धा प्रकाराच्या नवव्या फेरीत चीनच्या खेळाडूचा पराभव केला. या विजयासह गुकेश आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात केवळ आता अर्ध्या गुणाचे अंतर आहे. स्पर्धेत आता शेवटची फेरी बाकी आहे.

June 6, 2025 3:27 PM

views 42

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला. या दौऱ्यात ५ कसोटी सामने होणार असून ते २०२५-२०२७ च्या आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे. शुभमन...

June 5, 2025 7:08 PM

views 10

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात आज झालेल्या सामन्यात भारताची चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. त्यांनी डेन्मार्कच्या रासमुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्ड या जोडीचा १६-२१, २१-१८,२२-२० असा पराभव केला.   दरम्यान, भारताच्या पी.व्...

June 5, 2025 2:51 PM

views 59

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्य फेरीत पी.व्ही.सिंधूचा पराभव

इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचा थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगकडून पराभव झाला. पहिल्या फेरीत २२-२० गुणांनी सिंधू आघाडीवर होती, त्यानंतर दुसऱ्या फेरीत २१-१० आणि तिसऱ्या फेरीत २१-१८ अशी आघाडी घेत चोचुवोंगने या फेरीत विजय मिळवला. तसंच आज महिला दु...

June 5, 2025 2:47 PM

views 15

महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

महिलांच्या हॉकी आशिया चषक २०२५ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही स्पर्धा ५ ते १४ सप्टेंबर दरम्यान चीनमधल्या हांगझो शहरात खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाचा पहिला सामना ५ सप्टेंबरला थायलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतीय संघाचा समावेश ब गटात करण्यात आला असून जपान, था...

June 4, 2025 8:19 PM

views 11

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा उपांत्य फेरीत प्रवेश

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याने अमेरिकेच्या टॉमी पॉल याच्यावर ६-०, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. येत्या शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात त्याची गाठ इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीशी पडेल. 

June 4, 2025 8:06 PM

views 22

चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 6 जणांचा मृत्यू

बेंगळुरु मधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंगराचेंगरी झाल...

June 4, 2025 10:37 AM

views 26

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबाद इथं झालेल्या चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरू संघानं किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्सनं 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबनं 184 धावा क...

June 3, 2025 8:13 PM

views 22

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना सुरू

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ८ व्या षटकात २ बाद ६७ धावा झाल्य...

June 3, 2025 1:31 PM

views 12

बंगळुरूमध्ये ५ जुलैपासून नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा सुरू

नीरज चोप्रा क्लासिक २०२५ भालाफेक स्पर्धा येत्या गुरुवारपासून बंगळुरूमधल्या श्री कांतीरवा स्टेडिअमवर सुरु होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा २४ मेपासून सुरु होणार होती. मात्र, ओपरेशन सिंदूर आणि देशाचे ऐक्य प्रदर्शित करण्यासाठी हे आयोजन पुढं ढकलण्यात आलं होतं. ही भारतानं आयोजित केलेली पहिलीच आंतराराष्ट्री...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.