खेळ

July 31, 2025 10:42 AM

views 47

भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्सच्या आयोजकांनी भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द केला आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका यामुळं भारतीय संघानं खेळातून माघार घेतली आण...

July 30, 2025 3:23 PM

views 12

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची दमदार सुरुवात

मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताने विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसह दमदार सुरुवात केली. पुरुष दुहेरीत सत्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने मलेशियाच्या लो हंग यी आणि एनग चियॉंगवर सरळ सेटमध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.महिला एकेरीमध्ये, अनमोल खरब आणि तस्नीम मीर यांनी त्यांच...

July 28, 2025 7:18 PM

views 17

जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे भारताला १२ पदकांची कमाई

 जर्मनीत झालेल्या एफआयएसयू जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे भारतानं एकंदर १२ पदकांची कमाई केली. यात २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी अंकिता ध्यानी हिनं महिलांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं, तर पुरुषांच्या रिले आणि महिलांच्या रेस वॉक संघांन...

July 28, 2025 7:42 PM

views 27

FIDE Chess World Cup : दिव्या देशमुख ठरली विश्वविजेती

भारताची दिव्या देशमुख हिनं फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरलं आहे. जॉर्जियाच्या बाटुमी इथं झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिनं भारताच्याच हंपी कोनेरू हिच्यावर अटीतटीच्या टायब्रेकमध्ये एका गुणानं मात केली. या यशाबरोबरच दिव्या ही भारताची ८८वी ग्रँडमास्टर ठरली आहे. हंपी कोनेरू, हरिका द्रोणा...

July 28, 2025 2:35 PM

views 12

डीकॅथलॉन प्रकारात भारताच्या तेजस्विन शंकरचा नवा राष्ट्रीय विक्रम

वीस्लॉ झेपीवस्की स्मृती क्रीडा स्पर्धेत भारताच्या तेजस्विन शंकर यानं डीकॅथलॉन प्रकारात दुसऱ्यांदा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. पोलंड इथं काल झालेल्या सामन्यात त्यानं ७ हजार ८२६ गुण मिळवले आणि याआधीचा ७ हजार ६६६ गुणांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. डीकॅथलॉनमध्ये या प्रकारात धावणं, उंच उडी, ग...

July 28, 2025 2:37 PM

views 21

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत चौथा सामना अनिर्णित

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत मँचेस्टर इथला चौथा सामना अनिर्णित राहीला. अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राखण्यात काल भारतीय संघाला यश मिळालं.  कर्णधार शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची झुंजार शतकं तर के एल राहुलच्या ९० धावा ही डावाची वैशिष्ट्यं ठर...

July 27, 2025 1:33 PM

views 20

FIDE Chess World Cup : कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात विजेतेपदासाठीची लढत सुरु

फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरु हंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ  खेळाडूंमधे विजेतेपदासाठीची लढत सुरु आहे. पहिला गेम काल बरोबरीत राहिल्यानं दोघींनाही प्रत्येकी अर्धा गुण देण्यात आला आहे.  दुसरा निर्णायक गेम आज होणार आहे.

July 26, 2025 8:40 PM

views 14

FIDE Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ

फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात पहिला टप्पा ड्रॉ झाला आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. त्यामुळे भारताच्या महिला बुद्धिबळाच्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा  ठरला आहे.    या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपट...

July 26, 2025 2:24 PM

views 23

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची उपांत्य फेरीत धडक

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. चीनमधे चांगझाऊ इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत त्यांनी मलेशियाच्या जोडीचा पराभव केला असून आता त्यांची लढत  मलेशियाच्याच आरॉन चिया आणि सो वूई यिक या जोडीशी होणार  आहे. 

July 26, 2025 1:50 PM

views 15

FIDE Women’s Chess World Cup: कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत

फिडे महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स, कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपदही भारताकडे येणार आहे. या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढच्या वर्षीच्या फिडे महिला कँडिडेट्स टूर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.