बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर करंडक स्पर्धेत दुसऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या दिवशी आज भारत आपला दुसरा डाव खेळणार आहे.
इंग्लंडनं पहिल्या डावात ४०७ धावा केल्या. यात मोहम्मद सिराजनं सहा आणि आकाश दीपने चार बळी घेतले. इंग्लंडच्या जेमी स्मिथने नाबाद १८४ धावा तर हॅरी ब्रूकने १५८ केल्या.
तिसऱ्या दिवसअखेर काल भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध २४४ धावांची आघाडी घेतली असून, केएल राहुल २८ आणि करुण नायर ७ धावांवर खेळत आहेत. आजच्या दिवसाचा खेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल.