खेळ

August 20, 2025 1:16 PM

views 15

२० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित मलिकला रौप्य पदक

बल्गेरियात सामोकोव्ह इथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित मलिक याने रौप्य पदक मिळवलं आहे. अंतिम फेरीत त्याला रशियाच्या मॅगोमेड ओडझामिरो याच्याकडून ५-८ असा पराभव पत्करावा लागला. महिला गटात सृष्टीने ६८ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत जर्म...

August 20, 2025 9:43 AM

views 44

आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलला सुवर्णपदक

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलने कझाकस्तानमधील श्यामकेंट इथं झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताला मिळालेलं हे तिसरं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. रश्मिकाने 241 पूर्णांक 9 गुणांसह कनिष्ठ महिला एअर पिस्तूल मुकुट जिंकला. दुहेरी ऑलिंपिक कांस्यपदक विजेती मनु ...

August 19, 2025 7:41 PM

views 29

आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल. शुभमन गिल याच्याकडे उपकर्णधार पदाची धुरा असेल. या संघात अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप या...

August 19, 2025 11:10 AM

views 24

आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गिरीश गुप्ताला सुवर्णपदक

कझाकस्तानमधल्या शिमकेंत इथं सुरू असलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गिरीश गुप्ता यानं युवा पुरुष गटात 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. 17 वर्षाच्या गुप्तानं अंतिम फेरीत 241 पूर्णांक 3 गुण मिळवत बाजी मारली, तर त्याचा 14 वर्षीय भारतीय प्रतिस्पर्धी देव प्रताप या...

August 18, 2025 2:37 PM

views 20

कुस्तीपटू विशाल याची लढत आज कांस्यपदकासाठी होणार

बल्गेरिया इथं सुरू असलेल्या २० वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात भारतीय कुस्तीपटू विशाल याची लढत आज कांस्यपदकासाठी होणार आहे. याआधी झालेल्या सामन्यात अमेरिकेच्या कुस्तीपटूकडून विशाल पराभूत झाला होता.

August 18, 2025 1:41 PM

views 26

भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा डायमंड लीगमधे प्रवेश निश्चित

विद्यमान विश्वविजेता आणि दोनवेळा ऑलिम्पिक पदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं डायमंड लीगच्या अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. २७ आणि २८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमध्ये ही स्पर्धा होईल.   नुकत्याच झालेल्या सिलेसिया लीगमध्ये त्यानं भाग घेतला नसला, तरी या हंगामातली त्याची कामगिरी उत्तम असल...

August 18, 2025 9:58 AM

views 14

मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत देविका सिहागचा महिला एकेरीत विजय

भारताची बॅडमिंटनपटू देविका सिहागने मलेशिया इंटरनॅशनल चॅलेंज बँडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने पाचव्या मानांकित इशाराणी बरुआ हिचा पराभव केला. ही स्पर्धा जागतिक बँडमिंटन फेडरेशनच्या प्रायोगिक 3×15 स्कोअरिंग फॉरमॅट अंतर्गत खेळवली जात आहे.

August 16, 2025 8:05 PM

views 17

अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19  विश्वचषकासाठीत स्थान

अमेरिकेत जॉर्जियातल्या रायडल इथं झालेल्या पात्रता फेरीमध्ये सर्वाधिक गुण मिळवतं अमेरिकेनं २०२६ मध्ये होणाऱ्या आयसीसी अंडर 19  विश्वचषकासाठी आपलं स्थान पक्क केलं आहे. अर्जुन महेशच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेच्या संघानं पात्रता फेरीत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त ...

August 16, 2025 7:53 PM

views 21

भारत प्रथमच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भूषवणार

भारत प्रथमच सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. उत्तराखंडमधल्या देहरादून इथं येत्या २० ते २३ ऑगस्ट दरम्यान आशियाई खुल्या शॉर्ट ट्रॅक जलद स्केटिंग चषक स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.  महाराणा प्रताप क्रीडा महाविद्यालयात होणाऱ्या या स्पर्धेत ११ हून अधिक आशियाई देश ...

August 16, 2025 7:53 PM

views 17

स्क्वॅशपटू अनाहत सिंहनं एनएसडब्ल्यू बेगा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंहनं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू बेगा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत तिनं इजिप्तच्या स्क्वॅशपटू नूर हिचा  ५४ मिनिटात ३-२ नं पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना इजिप्तच्या हबीबा हिच्याशी होईल. हबीबानं उपांत्य फेरीत आकांक्षा साळुंखे हि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.