खेळ

August 25, 2025 1:39 PM

views 30

युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिनं पटकावलं सुवर्ण पदक

कॅनडातील विनीपेग इथं झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील शर्वरी शेंडे हिनं काल १८ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी शर्वरी ही दुसरी भारतीय महिला स्पर्धक ठरली आहे.   या आधी शनिवारी चिकिता तनीपार्थी हिनं २१ वर्षांखालील गटात...

August 24, 2025 3:00 PM

views 19

यू-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात

बल्गेरियातल्या समोकोव्ह इथं सुरु असलेल्या यू-२० जागतिक कुस्ती स्पर्धेत आज मैदानात उतरलेल्या  भारताच्या ग्रीको-रोमन गटातल्या  सर्व पाच  कुस्तीपटूंना पराभव पत्करावा लागला, यामुळं  या स्पर्धेतलं  भारताचं आव्हान  संपुष्टात आलं.   या स्पर्धेत एकमेव पदक विजेता ठरलेल्या सूरजनं  ६० किलो वजनी गटात कांस्...

August 24, 2025 1:34 PM

views 33

क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेट संघातील नामवंत फलंदाज चेतेश्वर पुजारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटने मला अमूल्य संधी, अनुभव, ध्येय आणि प्रेम दिलं तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली अशा शब्दात पुजाराने समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्य...

August 24, 2025 12:27 PM

views 29

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरुवात

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून न्यूयॉर्कमध्ये सुरुवात होत आहे. पुरूष एकेरीमध्ये जागतिक अव्वल खेळाडू इटलीचा जेनिक सिन्नर आणि दुसऱ्या क्रमांकाचा स्पेनचा कार्लोस अल्कराज, चार वेळा विजेता राहिलेला नोवाक जोकोविच आणि जर्मनीचा अल्केझांडर झावरेव यांचा सहभाग असेल तर  महिलांच्या गटात, गतविजेती बेलारूस...

August 24, 2025 10:37 AM

views 41

आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

कझाकस्तान इथं सुरू अकलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिल वलारिवन, शांभवी क्षीरसागर, नरेन प्रणव यांनी दुसरे सुवर्ण पदक मिळवले.   भारताने दहा मीटर नेमबाजी प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे सुवर्णपदकांची संख्या 23 वर पोहोचली असून भारताने 8 रौप्...

August 23, 2025 8:15 PM

views 19

खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा समारोप

जम्मू आणि काश्मीरमध्ये  श्रीनगरच्या दल सरोवरात गेले तीन दिवस सुरु असलेल्या खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. यात नौकानयन, कयाकिंग आणि कनोइंग स्पर्धांचा समावेश होता. मध्य प्रदेशचा  संघ १८ पदकं मिळवून प्रथम स्थानावर आहे. ओडिशा आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्...

August 23, 2025 1:31 PM

views 25

२१ वर्षांखालच्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं पटकावलं जेतेपद

कॅनडामध्ये सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत २१ वर्षांखालच्या भारतीय संघानं जेतेपद पटकावलं. कुशल दलाल, मिहिर अपार आणि गणेश मणी रत्नम यांनी कंपाऊंड प्रकारात जर्मनीच्या संघाला नमवून सुवर्णपदकाची कमाई केली.   या स्पर्धेत १८ वर्षाखालच्या भारतीय संघानं अमेरिकेला नमवून कॅडेट अजिंक...

August 22, 2025 8:43 PM

views 28

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एलावेनील वालारिवनला सुर्वणपदक

कझाकस्तानमधे सुरु असलेल्या१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या एलावेनील वालारिवननं सुर्वणपदक पटकावलं. अंतिम फेरीत तिनं २५३ पूर्णांक ६ दशांश गुण मिळवले. हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. चीनच्या पेंग शिनलूनं रौप्य, तर दक्षिण कोरियाच्या क्वॉन युन जी हिनं कांस्यपदक...

August 21, 2025 1:32 PM

views 18

श्रीनगरमधल्या दाल सरोवरात खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाला सुरुवात

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाल सरोवरात आजपासून येत्या २३ ऑगस्टपर्यंत तीन दिवसीय खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा  उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा होत आहे. खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचा शुभंकर हिमालयीन किंगफिशरपासून प्रेरित...

August 20, 2025 3:21 PM

views 18

पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ जाहीर

येत्या २९ ऑगस्टपासून बिहार इथे होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ आज जाहीर झाला. हरमनप्रीत सिंग हे संघाचे कर्णधार असणार आहेत. पुढच्या वर्षी हॉकी विश्व चषक स्पर्धा बेल्जीयम नेदरलँड इथे होणार आहेत. त्याची पात्रता फेरी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जपान,चीन, कझाक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.