खेळ

August 7, 2025 2:33 PM August 7, 2025 2:33 PM

views 13

यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार

चीनमध्ये चेंगडू इथे आजपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. १९८१पासून सुरू झालेल्या या स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि यात ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट नसलेले खेळ खेळवले जातात. यंदा ३४ विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत...

August 7, 2025 1:40 PM August 7, 2025 1:40 PM

views 14

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीला सुवर्ण पदक

पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अनू राणीनं सुवर्ण पदक पटकावलं. तिनं यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा ६२ पूर्णांक ५९ शतांश मीटर अंतरावर भाला फेकला. या विजयामुळे अनू राणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडुंमध्ये स्थान मिळालं आहे. इतर स्पर्धां...

August 5, 2025 2:42 PM August 5, 2025 2:42 PM

views 26

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिका बरोबरीत सुटल्यामुळे भारत जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंग्लंडबरोबर साधलेल्या गुणांच्या बरोबरीमुळे भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ओव्हल इथे झालेल्या या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतानं ...

August 4, 2025 8:16 PM August 4, 2025 8:16 PM

views 16

अँडरसन- तेंडुलकर करंडक क्रिकेट सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय

 भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन- तेंडुलकर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेतला अखेरचा आणि पाचवा सामना आज भारतानं सहा धावांनी जिंकला. विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव ३६७ धावात आटोपला. ५ गडी बाद करणारा मोहम्मद सिराज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तोच सामनावी...

August 4, 2025 1:39 PM August 4, 2025 1:39 PM

views 11

अँडरसन – तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर

लंडनच्या केनिंगटन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात काल चौथ्या दिवशी अपुऱ्या उजेडामुळं खेळ थांबवण्यात आला तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सहा गडी बाद ३३९ धावा झाल्या होत्या. ज्यो रूटनं १०५ आणि हॅरी ब्रुकनं १११ धावा केल्या. आज पाचव्या द...

August 4, 2025 10:21 AM August 4, 2025 10:21 AM

views 10

कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये भारताच्या अब्दुल्ला अबूबाकरला विजेतेपद

माजी आशियाई पदक विजेता खेळाडू अब्दुल्ला अबूबाकर यानं कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटीक्स स्पर्धेत तिहेरी उडीमध्ये विजेतेपद पटकावलं. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 1 सेंटीमीटर लांब उडी मारुन जेतेपद मिळवलं. या विजयामुळे अबूबाकर सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या...

August 3, 2025 8:01 PM August 3, 2025 8:01 PM

views 13

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचंही संकट

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचं संकट आहे.    या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं आपला दुसरा डाव का...

August 3, 2025 2:19 PM August 3, 2025 2:19 PM

views 11

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत

ब्राझीलमध्ये फोज दो इगुआचू इथं सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताच्या मानूष शाह आणि दिया चितळे यांची लढत जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशिमोटो यांच्याशी होणार आहे.   भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री ९ वाजता हा सामना सुरु होईल. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरी...

August 3, 2025 2:15 PM August 3, 2025 2:15 PM

views 8

१७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धात लैकीला रौप्यपदक

ग्रीसमध्ये सुरु असलेल्या, १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत, भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या ११० किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक जिंकलं. दरम्यान, आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरनं पुरुषांच्या ६० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिटेंडरनं उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या बेकासिल ...

August 3, 2025 2:58 PM August 3, 2025 2:58 PM

views 38

भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत

लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १ बाद ५० धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल.   भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. या मालिक...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.