खेळ

September 7, 2025 10:55 AM September 7, 2025 10:55 AM

views 21

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत जरीनचा पहिल्या फेरीत विजय

इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्धा निखत जरीनने काल महिलांच्या ५१ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत विजय मिळवला. वर्षभर दुखापतीमुळे बाहेर राहिलेल्या बिगरमानांकित निखतने जोरदार पुनरागमन करत ३२ व्या फेरीत अमेरिकेच्या जेनिफर लोझानोला ५-० ने हरव...

September 6, 2025 3:14 PM September 6, 2025 3:14 PM

views 15

काफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना ओमान संघाशी होणार

ताजिकिस्तान इथं सुरु असलेल्या काफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या सोमवारी आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ओमानच्या संघाशी होणार आहे. उझबेकिस्तान आणि ओमान या दोन्ही संघांचे अ गटात समान गुण झाले असून हे दोन्ही संघ पहिल्या दोन स्थानांवर असून तिसरं स्थान गाठण्यास...

September 6, 2025 3:11 PM September 6, 2025 3:11 PM

views 19

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये भारताचा सामना चीनविरुद्ध होणार

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनविरुद्ध होणार आहे. आत्तापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे. सुपर फोरच्या पदकतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय राहिल्यानं आशिया करंडकासाठी प्रबळ दावेदार मानल...

September 6, 2025 2:56 PM September 6, 2025 2:56 PM

views 15

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरची धडक

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात यानिक सिनर यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-१, ३-६, ६-३, ६-४ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अजिंक्यपदासाठी त्याचा सामना कार्लोस अल्काराज याच्यासोबत होईल. कार्लोस यानं नोव्हाक जोकोविचवर ६-४, ७-६, ६-२ असा विजय मिळवला. महिला दुहे...

September 5, 2025 9:03 PM September 5, 2025 9:03 PM

views 17

Asia Cup 2025: हॉकी स्पर्धेत पुरुषांचा चीनशी, तर महिलांचा जपान संघासोबत मुकाबला

बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा सामना चीनशी होणार आहे. हा सुपर फोर फेरीतला सामना उद्या संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. या स्पर्धेत काल भारतानं मलेशियाचा ४-१ असा पराभव केला. आतापर्यंत अपराजित राहिलेला भारत सुपर फोर फेरीच्या गुणतालिकेत चार गुणांसह अ...

September 4, 2025 8:20 PM September 4, 2025 8:20 PM

views 8

इंग्लंडमध्ये आज सुरु झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या पवन बर्तवालची विजयी सलामी

इंग्लंडमध्ये लिव्हरपूल इथं जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या पवन बर्तवाल या खेळाडूनं ५५ किलो वजनी गटात ब्राझीलच्या मायकल डग्लस दा सिल्वा त्रिनदेद या खेळाडूचा ३-२ असा पराभव केला. या स्पर्धेत भारताकडून २० खेळाडूंचा संघ सहभागी होत आहे. यात पुर...

August 29, 2025 1:07 PM August 29, 2025 1:07 PM

views 15

 युरोपात लागलेल्या वणव्यात १० लाख हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्राचं नुकसान

 युरोपात लागलेल्या वणव्यात १० लाख हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्राचं नुकसान झालं आहे. हा युरोपातला २०२५ या वर्षातला आतापर्यंतच्या सर्वात भीषण वणवा मानला जात असून, २०२४ मधल्या वणव्यात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत हे प्रमाण चार पटीनं जास्त असल्याचं वृत्त आहे.   हवामान बदलामुळे या वणव्याची तीव्रता जास...

August 29, 2025 11:13 AM August 29, 2025 11:13 AM

views 9

पुरुष हॉकी आशिया करंडक 2025 ला आजपासून बिहारमध्ये सुरूवात

पुरुष हॉकी आशिया करंडक 2025 ला आजपासून बिहारमध्ये सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय तसंच आशियातील सर्व संघांच्या खेळाडूना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि आशियातील लाखो लोकांच्या हृदयात हॉकी या खेळला एक विशेष स्थान आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. &nbsp...

August 28, 2025 3:29 PM August 28, 2025 3:29 PM

views 19

पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं अंतिम १६ मध्ये स्थान

पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी काल अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने चिनी तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि यांग पो हान यांचा पराभव केला.   म...

August 28, 2025 1:30 PM August 28, 2025 1:30 PM

views 6

ग्रँडमास्टर प्रज्ञानंदाचा ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये प्रवेश निश्चित

भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने ग्रँड चेस टूर फायनल्समध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. प्रज्ञानंदाने सिंकफिल्ड कपमध्ये त्यानं उपविजेतेपद मिळवलं आहे.  अमेरिकेच्या वेस्ली सोने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकले आहे.