खेळ

September 20, 2025 4:00 PM September 20, 2025 4:00 PM

views 38

बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांना विजेतेपद

अखिल भारतीय वरिष्ठ गट बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांनी विजेतेपद पटकावलं. त्यांनी चौथी मानांकिंत जोडी सिद्धार्थ इलांगो आणि संतोष गजेंद्रन जोडीचा २१-१६, २१-१० असा पराभव केला.

September 20, 2025 3:43 PM September 20, 2025 3:43 PM

views 23

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू

आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्शदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अबुधाबी इथं ओमानविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी-ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला.   अर्शदीपचा हा सदुसष्ठावा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना होता. अफगाणिस्तानच्या राशिद खानने ५३ सामन...

September 20, 2025 2:39 PM September 20, 2025 2:39 PM

views 17

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल

चीन मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत रेन झियांग यू आणि झी हाओनान या चिनी जोडीला पराभूत करून रँकीरेड्डी आणि शेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला...

September 20, 2025 10:57 AM September 20, 2025 10:57 AM

views 148

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत सुपर फोरमध्ये दाखल

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अबुधाबी इथं झालेल्या अ गटातील अंतिम साखळी सामन्यात भारतीय संघानं ओमानचा 21 धावांनी पराभव केला. भारतानं ओमानपुढं विजयासाठी 20 षटकांत 189 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण ओमानचा संघ 4 गड्यांच्या बदल्यात केवळ 167 धावा करू शकला.   अर्शदीप सिंग 64 सामन्यांमध्ये 100 आंतर...

September 19, 2025 1:42 PM September 19, 2025 1:42 PM

views 12

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पंघलला कांस्यपदक

भारताची कुस्तीपटू अंतिम पंघल हिनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावून भारताचं पदकांचं खातं उघडलं. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात तिनं स्विडनच्या प्रतिस्पर्ध्याचा ९-१ असा पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे आणि ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

September 18, 2025 1:07 PM September 18, 2025 1:07 PM

views 11

चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750  स्पर्धेत भारताची आघाडीची शटलर पीव्ही सिंधूनं  आज थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूचा या स्पर्धेतला हा सलग दुसरा विजय आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अन ...

September 17, 2025 3:35 PM September 17, 2025 3:35 PM

views 21

ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सर्वेश कुशारे यानं मिळवलं सहावं स्थान

टोक्यो इथं झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानं सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करून सहावं स्थान मिळवलं. शेवटच्या प्रयत्नात त्यानं २ पूर्णांक २८ शतांश मीटर उंच उडी मारली.

September 17, 2025 2:58 PM September 17, 2025 2:58 PM

views 11

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार आहे. जपानची राजधानी टोक्यो इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात नीरजचा सामना डायमंड लीगचा विजेता ज्युलियन वेबर, केशॉर्न वॉलकॉट, जेकब वादलेच आणि भारताचाच सचिन यादव यांच्याशी होईल.   भारती...

September 17, 2025 2:50 PM September 17, 2025 2:50 PM

views 17

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरू

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासा...

September 16, 2025 1:36 PM September 16, 2025 1:36 PM

views 23

FIDE Women’s Grand Swiss: भारताची वैशाली रमेशबाबू सलग दुसऱ्यांदा अजिंक्य

भारताची बुद्धीबळपटू वैशाली रमेशबाबू हिने फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तिने अंतिम फेरीत माजी विश्वविजेती चीनची टॅन झोंगई हिच्यावर मात केली. वैशालीचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं विजेतेपद असून, अशी कामगिरी करणारी ती पहिली बुद्धीबळपटू आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृ...