खेळ

October 22, 2025 3:25 PM

views 114

भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात पदोन्नती

 ऑलिंपिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा याला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथे हा समारंभ झाला. त्यांनी नीरज चोप्रा याच्या लष्करी गणवेशावर नवीन पदाचं चिन...

October 21, 2025 12:47 PM

views 88

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा बांगलादेशवर विजय

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, नवी मुंबईच्या डॉक्टर डीवाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर काल झालेल्या उत्कंठावर्धक सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशचा 7 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं हसिनी परेराच्या 85 धावांच्या जोरावर सर्व बाद 202 धावा केल्या. प्...

October 20, 2025 1:32 PM

views 27

आशियाई रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताला १० पदकांची कमाई

व्हिएतनाम इथं झालेल्या आशियाई रोईंग म्हणजे नौका वल्हवण्याच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं १० पदकांची कमाई केली. यात ३ सुवर्ण, ५ रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. पुरुष गटात दुहेरी स्कल, चौघांच्या स्कल आणि एकेरी स्कल या प्रकारात भारताच्या खेळाडूंनी सुवर्णपदकं पटकावली.

October 20, 2025 12:55 PM

views 69

ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात

क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भार...

October 19, 2025 2:52 PM

views 88

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका सुरू

भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या तीन सामन्यांच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेला आजपासून पर्थ इथं सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारतीय फलंदाज पारशी चमक दाखवू शकले नाही. सलामीवर रोहित शर्मा ८ तर कर्णधार शुभमन गिल दहा धावा करून झटपट बाद झाले. तर व...

October 18, 2025 8:10 PM

views 27

ISSF जागतिक शॉटगन २०२५ स्पर्धेत भारताच्या झोरावर सिंहला कांस्यपदक

ग्रीसमध्ये अथेन्स इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ (ISSF) जागतिक शॉटगन २०२५ स्पर्धेत भारतीय नेमबाज झोरावर सिंह यानं पुरुष गटात कांस्यपदकाला गवसणी घातली. अंतिम फेरीत खराब हवामान आणि अंधुक प्रकाश यावर मात करून त्यानं ५०पैकी ३१ गुण मिळवले आणि तिसरं स्थान मिळवलं.

October 18, 2025 5:34 PM

views 57

BWF जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत

गुवाहाटी इथं सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा हिनं आज अंतिम फेरीत धडक मारली. तिनं चीनच्या लिऊ सी या हिच्यावर १५-११, १५-९ अशी सहज मात केली. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती अवघी पाचवी भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

October 18, 2025 1:41 PM

views 30

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला कांस्यपदक

चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज आहे. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या एला गिबसन हिच्यावर १५० विरुद्ध १४५ गुण मिळवून मात के...

October 18, 2025 1:38 PM

views 194

भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार आहे. काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्त्विक-चिराग जोडीनं इंडोनेशियाच्या जोड...

October 16, 2025 8:19 PM

views 43

ICC Women’s Cricket : बांगलादेशाचं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्‍व चषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशानं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. आणि निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून १९८ धावा केल्या.    या धावसंख्येच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.