खेळ

July 13, 2024 1:37 PM

views 13

भारत आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार

क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज हरारे मध्ये संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वे...

July 13, 2024 12:22 PM

views 24

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंची यादी काल जाहीर झाली. पॅरिस इथं 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीत 28 खेळांडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये 11 महिला आणि 17 पुरुष खेळाडू आहेत. यंदाच्या या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा सर्वा...

July 12, 2024 2:53 PM

views 50

विम्बल्डन टेनिस : पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत  गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. दुसरीकडे, रशियाचा पाचवा मानांकित मेदवेदेव यानं इटलीच्या अव्वल मानांकित यानिक जिनरवर विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात सात वेळा ...

July 12, 2024 12:38 PM

views 34

भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. पल्लिकल आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर २६, २७ आणि २९ जुलैला वीस षटकांचे सामने होणार आहेत. त्यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची आंतरराष्ट्रीय मालिका कोलंबोच्या आर प्रेमदास आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर १, ४ आणि ७ ऑगस्ट...

July 11, 2024 4:27 PM

views 14

क्रीडा पत्रकारितेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुहास जोशी, खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंग असोसिएशननं नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. विलास दळवी यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विज...

July 11, 2024 3:29 PM

views 38

युरो कप फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश

युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा २-१ अशा फरकानं पराभव करून इंग्लंडनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येत्या १५ तारखेला होणाऱ्या अंतिम फेरीतइंग्लंडचा मुकाबला स्पेनबरोबर होणार आहे.

July 11, 2024 8:52 AM

views 33

झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील वीस षटकांच्या पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना काल भारतानं 23 धावांनी जिंकला. आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 182 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल यजमान संघाचा डाव 159 धावांत संपुष्टात ...

July 10, 2024 11:43 AM

views 26

विम्बलडन टेनिस स्पर्धा : रशियाच्या डॅनिएल मेदवेदेव उपांत्य फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विम्बलडन टेनिस स्पर्धेत डॅनिएल मेदवेदेव यानं जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जानिक सिन्नेर याचा 6-7, 6-4, 7-6, 2-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या मोदवेदेवनं स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येत्या शुक्रवारी जा...

July 10, 2024 10:55 AM

views 26

गौतम गंभीर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे काल ही घोषणा केली. भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपली निवृत्ती जाहीर केली होती; त...

July 10, 2024 3:12 PM

views 21

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.