खेळ

July 20, 2024 8:21 PM

views 27

राफेल नदालची स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

राफेल नदालने स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या ड्युए आजुकोविकचा त्यानं ४-६, ६-३, आणि ६-४ असा तीन सेट्स मधे पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तियागो ऑगस्टीन तिरांते आणि नुनो बोर्जेस यांच्यात लढत होत असून, त्यातल्या विजेत्याचा सामना अंतिम फेरीत नदालबरोबर होईल...

July 20, 2024 1:59 PM

views 36

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलाचे २४ जवान

पॅरिस इथं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये चोवीस सशस्त्र दलाचे जवान सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध भालाफेकपटू आणि २०२० मधल्या टोकियो ऑलिंपिक मधला सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याच्यासह एकूण २२ पुरुष आणि दोन महिला खेळाडू य...

July 20, 2024 9:14 AM

views 42

टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोब...

July 19, 2024 7:28 PM

views 39

महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा आज पाकिस्तानशी सामना

महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध होत आहे. श्रीलंकेमध्ये दाम्बुला इथं रनगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.   दरम्यान, आज दुपारी झालेल्...

July 19, 2024 12:12 PM

views 45

श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार

श्रीलंकेविरुद्ध आगामी वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे. &...

July 18, 2024 8:39 PM

views 39

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेतून भारताचा सुमित नागल बाहेर

स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलला आज सरळ सेट्समधे पराभूत झाल्यानं स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या मारियानो नावोननं त्याला ६-४, ६-२ असं पराभूत केलं. त्याआधी पुरुष दुहेरीतही त्याला त्याचा पोलीश जोडीदार कॅरोल ड्रझेविकी यांना पराभव पत...

July 18, 2024 3:35 PM

views 34

स्वीडिश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सुमित नागलचा अर्जेंटिनाच्या मारियानो नॅव्होनशी लढत

स्विडीश ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागलचा सामना आज अर्जेंटिनाच्या मरियानो नवोने याच्याशी होणार आहे.स्विडनच्या बस्ताद टेनिस स्टेडियमच्या सेंटर कोर्टमध्ये आज दुपारी हा सामना होईल. त्याआधी मंगळवारी झालेल्या सामन्यात सुमित नागलने स्विडनच्या एलियास यमेर याला पराभूत करत उपांत...

July 18, 2024 3:05 PM

views 38

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या दाम्बुला इथं सुरू

महिला क्रिकेटमध्ये आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा उद्या श्रीलंकेत दाम्बुला इथं सुरू होत आहे. सलामीचा सामना गट ‘अ’ मधल्या नेपाळ आणि संयुक्त अरब अमीराती या संघात होणार आहे. त्यानंतर गतविजेता भारतीय संघाची लढत क्रिकेटमधला आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. भारतीय महिला संघाने २०१८ चा अपवाद वगळत...

July 18, 2024 5:34 PM

views 35

आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट जागतिक मानांकनं जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने यंदाची पुरुष टी ट्वेंटी ची क्रमवारी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ नं टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे. फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे, तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे....

July 17, 2024 8:39 PM

views 33

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं शिक्कामोर्तब

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. संघात ११७ खेळाडूंचा समावेश असून सोबत १४० तज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी असतील.   एथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक २९ खेळाडूंची निवड झाली असून नेमबाजीसाठी २१ जण भाग घेणार आहेत. हॉकीसाठी १९, टेबल टेनिसकरता आठ आणि ब...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.