खेळ

October 8, 2024 11:04 AM October 8, 2024 11:04 AM

views 8

भारत आणि बांग्लादेशदरम्यान मर्यादित 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या खेळला जाणार

भारत आणि बांग्लादेशदरम्यान मर्यादित 20 षटकांचा दुसरा क्रिकेट सामना उद्या नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे.  

October 8, 2024 11:00 AM October 8, 2024 11:00 AM

views 13

फिनलँड इथं आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून होणार सुरु

फिनलँड इथं आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होणार आहे. भारताचे पीव्ही सिंधू, किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यासह 12 क्रिडापटू स्पर्धेत सहभागी होत आहेत. या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत या स्पर्धा होणार आहे.

October 7, 2024 8:32 PM October 7, 2024 8:32 PM

views 6

श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड

श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांची निवड झाली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. नुकत्याच झालेल्या भारत, इंग्लंड तसंच न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यांमध्ये संघाची कामगिरी लक्षात घेऊ...

October 7, 2024 8:32 PM October 7, 2024 8:32 PM

views 4

भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकरची व्यावसायिक जिन्मॅस्टिक्समधून निवृत्तीची घोषणा

भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हिनं व्यावसायिक जिन्मॅस्टिक्समधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळासाठी लागणारी शारीरिक तंदुरुस्ती राखणं शक्य नसल्यानं २५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर दीपा जिम्नॅस्टिक्सचा निरोप घेत आहे. खूप विचार केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. तो घेणं सोपं नव्हतं, पण हीच यासाठीच...

October 7, 2024 2:01 PM October 7, 2024 2:01 PM

views 9

सोंघे सिंगापूर खुल्या बिलियर्ड्स स्पर्धेत पंकज अडवाणीने पटकावलं विजेतेपद

सोंघे सिंगापूर खुल्या बिलियर्ड्स स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीने काल सिंगापूरच्या जेडेन ओंग याला ५-१ ने नमवत विजेतेपद पटकावलं. यानंतर आता पंकज येत्या नोव्हेंबर महिन्यात दोहा इथं होणाऱ्या बिलियर्ड्सच्या जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होत आहे.

October 7, 2024 9:43 AM October 7, 2024 9:43 AM

views 6

बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

भारत बांग्लादेश यांच्यातला वीस षटकांचा पहिला क्रिकेट सामना भारतानं 7 गडी राखून जिंकला. विजयासाठी आवश्यक 128 धावा भारतीय संघानं 12 षटकांतच केल्या. संजू सॅम्सन आणि सूर्यकुमार यादव यांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. हार्दिक पांड्या 16 चेंडूत 39 धावा करुन नाबाद राहिला.   तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना...

October 6, 2024 8:08 PM October 6, 2024 8:08 PM

views 11

‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापनेसाठी सामंजस्य करार

मुंबईत कांदिवली इथं ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यातल्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत...

October 6, 2024 7:27 PM October 6, 2024 7:27 PM

views 26

हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर

मलेशियात होणाऱ्या बाराव्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा पुरुष ज्युनियर संघ जाहीर झाला आहे. या संघाचा कर्णधार अमिर असून उप कर्णधार रोहित असेल. तर पी आर श्रीजेश हे मुख्य प्रशिक्षक असतील.   भारतीय संघाचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी जपानशी होणार असून भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ब्रिटन...

October 6, 2024 7:49 PM October 6, 2024 7:49 PM

views 19

महिला टी- ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय

दुबई इथं  सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतानं पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १०५ धावा केल्या. भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली.   स्मृती मंधना आज लवकर बाद झा...

October 5, 2024 4:13 PM October 5, 2024 4:13 PM

views 7

इराणी चषकासाठी मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद, मुंबईचा सर्फराज खान ठरला सामनावीर

इराणी चषकासाठी मुंबई आणि शेष भारत यांच्यात उत्तरप्रदेशात लखनऊ इथं झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला, मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं विजेतेपद पटकावलं. हे मुंबईचं विक्रमी १५वं विजेतेपद ठरलं आहे. पहिल्या डावातला द्विशतकवीर मुंबईचा सर्फराज खान याला सामनाविराच्या पुरस्कारानं गौरवलं गेल...