खेळ

November 4, 2024 3:30 PM November 4, 2024 3:30 PM

views 9

वृद्धिमान साहाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहा याने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेला रणजी करंडकाचा हंगाम हा शेवटचा असेल, असं त्याने समाज माध्यमावरच्या संदेशात लिहिलं आहे. साहा याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत ४० कसोटी आणि ९ एकदिवसीय...

November 4, 2024 11:29 AM November 4, 2024 11:29 AM

views 3

पुरुष राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून चेन्नईतील सुरुवात

पुरुषांच्या 14 व्या राष्ट्रीय वरिष्ठ हॉकी अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून चेन्नईतील मेयर राधाकृष्णन हॉकी क्रीडांगणावर सुरुवात होत आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 31 संघ सहभागी होत आहेत.   साखळी स्वरूपात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने 13 नोव्हेंबरला, उपांत्यफ...

November 4, 2024 11:10 AM November 4, 2024 11:10 AM

views 11

कसोटी क्रिकेट मालिकेत भारताचा पराभव

भारतीय क्रिकेट संघातील वरच्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमवावी लागली. 2000 नंतर पहिल्यांदा भारतीय संघाला देशात झालेल्या कसोटी मालिकेतला एकही सामना जिंकला आलेला नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईत वानखेडे मैद...

November 3, 2024 2:50 PM November 3, 2024 2:50 PM

views 3

स्विस ओपन इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अतनू दासची कांस्यपदकाची कमाई

स्वित्झर्लंडच्या लूजान इथं झालेल्या स्विस ओपन इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अतनू दास यानं कांस्यपदकाची कमाई केली. ऑलिम्पिकपटू असलेल्या अतनू यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदकासाठीच्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या थॉमस रूफर याचा ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत अतनूला फ्रान्सच्...

November 3, 2024 1:27 PM November 3, 2024 1:27 PM

views 9

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिनं हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याचा २३-२१, २१-१८ असा थेट गेम्समध्ये पराभव केला. तिचा अंतिम फेरीचा सामना आज रात्री डेन्मार्कच्याच, सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी ह...

November 3, 2024 2:54 PM November 3, 2024 2:54 PM

views 27

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय – फ्रेंच जोडीला दुहेरीचं विजेतेपद

काँगोमध्ये सुरु असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय - फ्रेंच जोडीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी इटलीच्या सिमोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या अॅलेक बेकली या जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हे या जोडीचं पहिलं व्यावसायिक विजेतेपद ठरलं आहे. या विजेतेपदासोबतच करण ...

November 2, 2024 7:02 PM November 2, 2024 7:02 PM

views 13

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघांचे मिळून १५ गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रविंद्...

November 2, 2024 2:26 PM November 2, 2024 2:26 PM

views 9

१९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण, तीन रौप्य पदकांची कमाई

अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र ...

November 2, 2024 9:49 AM November 2, 2024 9:49 AM

views 13

मुंबईत न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर

मुंबईत सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर आहे. काल दिवसअखेर भारताच्या 4 बाद 86 धावा झाल्या होत्या.   शुभमन गिल 31 आणि ऋषभ पंत 1 धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी न्यूझीलंडचा डाव 235 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद...

November 1, 2024 2:05 PM November 1, 2024 2:05 PM

views 7

आय पी एल साठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या २०२५ हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधारपद दिलं होतं.   याआधीही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेल्या हार्दिकनं मधल्या काळ...