खेळ

December 12, 2024 8:40 PM

views 31

फिडे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशची विश्वविजेतेपदाला गवसणी

फिडे बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अटीतटीच्या लढतीनंतर भारताचा डी. गुकेश विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय तर सर्वात कमी वयाचा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे.   त्याने त्याचा प्रतिस्पर्धी चीनचा ग्रँडमास्टर डिंग लिरेन याचा या १४ व्या फेरीअखेर...

December 12, 2024 3:48 PM

views 19

प्रसार भारतीचा हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार

आगामी हॉकी इंडिया लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे, दूरदर्शन हॉकी इंडिया लीग २०२४-२५ साठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे.   या प्रसंगी हॉकी इंडिया लीग च्या प्रशासकीय समितीचे सदस्य भोलानाथ सिंग आणि प्रस...

December 12, 2024 10:15 AM

views 12

फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज डी. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यात अंतिम सामना

फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा गेल्या वेळचा विजेता डिंग लिरेन यांच्यात चौदावा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला जागतिक विजेत्याचा मान मिळणार आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यास उद्या स्पीडचेस प्रकारातून विजेता निवडला जाईल. काल गुकेश आणि...

December 12, 2024 10:12 AM

views 12

खेलो इंडिया 2025 हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार

खेलो इंडिया 2025 हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार आहेत. लडाखमध्ये 23 ते 27 जानेवारी या काळात आईस हॉकी आणि आईस स्किइंगसारख्या स्पर्धा होणार आहेत, तर जम्मू-काश्मीरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी या काळात अल्पाइन स्किइंग, स्नोबोर्डिंग अशा स्पर्धा होणार आहेत. केंद्री...

December 12, 2024 8:35 AM

views 43

महिलांच्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल पर्थ इथे झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 83 धावांनी पराभव करत ही संपूर्ण मालिका जिंकली. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 45 षटक आणि एका चेंडूत 215 धावांतच आटोपला. भारताकडून स्मृती मंधानान...

December 11, 2024 10:57 AM

views 8

कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालंपूर इथे झालेल्या १०व्या आशिया पॅसिफिक डेफ गेम्स २०२४ मध्ये, अर्थात कर्णबधीरांच्या स्पर्धांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय चमुचं अभिनंदन केलं आहे. 55 पदकं जिंकून देशासाठी अभिमानस्पद काम करणाऱ्या या प्रतिभावान खेळाडूंचं मोदी यांनी कौतुक केलं. या खेळांमधील...

December 11, 2024 10:51 AM

views 25

भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान ५० षटकांचा महिला क्रिकेट संघाचा आज अंतिम सामना

महिला क्रिकेटमध्ये, पन्नास षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघादरम्यान होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पर्थमधील मैदानावर सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मालिकेत आधीच २-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यांनी पहिला सामना पाच गड...

December 10, 2024 1:09 PM

views 24

बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केली आहे. सध्याचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यामुळे सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायमस्वरूपी सचिवांची नेमणूक होईपर्यंत सैकिया कार्यकारी ...

December 10, 2024 10:49 AM

views 11

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय

श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताच्या संघानं श्रीलंकेवर पाच-शून्य असं वर्चस्व राखलं आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या शेवटच्या थरारक सामन्यात भारताच्या संघानं तेरा धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला. संतोषकुमार या मालिकेत एकंदर 325 धावा नोंदवून सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. ...

December 10, 2024 10:03 AM

views 18

कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर ५-० असा विजय

ओमानमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक महिलांच्या कनिष्ठ गटातील हॉकी स्पर्धांमध्ये भारतानं मलेशियाचा 5-0 पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली. दीपिकानं भारताकडून तीन गोल केले. भारताचा पुढचा सामना चीनबरोबर होणार आहे. आशिया चषक स्पर्धांमधले पहिले पाच संघ पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक हॉकी स्पर्धांसाठी पात्र ठरणा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.