प्रादेशिक बातम्या

July 31, 2025 1:33 PM July 31, 2025 1:33 PM

views 4

राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं निधन

राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं आज नागपुरात वार्धाक्यानं निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांचं पार्थिव नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. प्रमिलाताईंच्या इच्छेनुसार त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.    राष...

July 30, 2025 7:15 PM July 30, 2025 7:15 PM

views 29

प्रत्येक शेताला १२ फुटांचा रस्ता मिळणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातले शेतरस्त्याचे सर्व वाद महसूल सप्ताहात मिटवून येत्या पाच वर्षात प्रत्येक शेताला १२ फुटांचा रस्ता उपलब्ध करुन देणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. येत्या १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या महसूल सप्ताहाबाबत त्यांनी आज मंत्रालयात बातमीदारांना माहिती दिली....

July 30, 2025 7:11 PM July 30, 2025 7:11 PM

views 18

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जलसंपदा विभागाला दिले. त्यांनी आज मुंबईत जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधांची कामं दर...

July 30, 2025 7:24 PM July 30, 2025 7:24 PM

views 19

पीक विम्यासाठी अर्ज करायची उद्या अंतिम मुदत

यंदाच्या खरीप आणि रबी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी आतापर्यंत केवळ ५५ हजार शेतकर्‍यांनी खरिपातल्या पिकांसाठी पीक विमा उतरविला आहे. ३१ जुलै ही पीक विम्याची अंतिम तारीख आहे. एका रुपयात पीक विमा योजनेत अनेक गैरप्रकार उघडकीला आल्यानं ती बंद करण्यात आली  आहे. यंदा पीक कापणी प्रयोगातून निघालेल्या उत्पादना...

July 30, 2025 3:53 PM July 30, 2025 3:53 PM

views 10

ITI मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

राज्यातल्या ITI अर्थात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यानुसार आता ७० ITI मध्ये सोलर टेक्निशियन, ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम  शिकविण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांन...

July 29, 2025 4:02 PM July 29, 2025 4:02 PM

views 22

पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय

राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या अंतर्गत एकंदर...

July 29, 2025 3:48 PM July 29, 2025 3:48 PM

views 4

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा होत आहे. वाघांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणं, वाघांच्या संवर्धनासाठी जगभरात होत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणं आणि याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन साजरा केला जातो.   वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; वाघांचं संरक्षण...

July 29, 2025 2:46 PM July 29, 2025 2:46 PM

views 9

धुळ्यात एसटी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू , २२  जण जखमी

महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरच्या दभाषी फाटा येथे आज सकाळी एका एसटी बसला झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून २२  जण जखमी झाले. शिरपूरला हून शिंदखेडा जाणाऱ्या या एसटीला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना शिरपूरच्...

July 28, 2025 7:26 PM July 28, 2025 7:26 PM

views 15

ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं आज नागपूरमधे निधन

ज्येष्ठ लेखिका कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचं आज नागपूरमधे निधन झालं. त्या ८३ वर्षांच्या होत्या. २० हून जास्त कादंबऱ्या, १० कथासंग्रह, नाटकं, प्रवासवर्णन, ललित लेखन अशी विविधांगी लेखनसंपदा त्यांच्या नावावर आहे.   विशेषतः मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, कृतार्थ, भौमर्षि, स्वयंभू अशा थोर व्यक्तींच्या जीवन...

July 28, 2025 7:04 PM July 28, 2025 7:04 PM

views 15

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.  नामांकन भरण्याच्या पहिल्याच दिवशी ७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.  ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून ३१ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे .