प्रादेशिक बातम्या

August 1, 2025 1:32 PM August 1, 2025 1:32 PM

views 7

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात घट

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात साडे तेहतीस रुपयांची घसरण झाल्याची घोषणा तेल विपणन कंपन्यांनी आज केली. त्यानुसार नवी दिल्लीत १९ किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत १ हजार ६३१ रुपये ५० पैसे असेल. मुंबईत या सिलेंडरची किंमत १ हजार ५८३ रुपये असेल. उपाहार गृह आणि तयार खाद्यपदार्थांच्या दुकानांना याचा...

August 1, 2025 12:45 PM August 1, 2025 12:45 PM

views 11

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या !

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे.    रक्षाबंधन तसंच, गोकुळाष्टमीसाठी येत्या ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी ७ आणि १४ ऑगस्ट रोजी चालवली जाईल. वांद्...

August 1, 2025 12:40 PM August 1, 2025 12:40 PM

views 4

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदल

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात खातेबदल झाला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना आता युवा, क्रीडा आणि औकाफ खातं मिळालं असून दत्तात्रय भरणे आता कृषीमंत्री असतील. माणिकराव कोकाटे आक्षेपार्ह वक्तव्यांसह विविध कारणांसाठी वादात सापडले होते. 

July 31, 2025 7:30 PM July 31, 2025 7:30 PM

views 16

गणेशोत्सवासाठी ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार !

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त या ६ गाड्या चालवण्यात येणार असून यामुळे आता गणपती विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. या गाड्यांसा...

July 31, 2025 7:20 PM July 31, 2025 7:20 PM

views 8

विधानसभा निवडणुकीत VVPAT आणि मतदान यंत्रातल्या मतांमध्ये तफावत आढळली नसल्याचा निर्वाळा

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदार संघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक...

July 31, 2025 7:13 PM July 31, 2025 7:13 PM

views 8

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर संमिश्र प्रतिक्रीया…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर मालेगावात संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या. हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचं स्वागत करत जल्लोष केला. शहराच्या पूर्व भागात या निकालाचा निषेध करण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांनी निर्णयामुळे निराश झाल्याचं सांगितलं. या निकालाविरोधात उच्च न्य...

July 31, 2025 7:08 PM July 31, 2025 7:08 PM

views 17

२००८ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ७ आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.   आरोपींमध्ये माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय या...

July 31, 2025 7:23 PM July 31, 2025 7:23 PM

views 28

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुखला ३ कोटी रुपयांचं बक्षीस

बुद्धीबळ विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिला ३ कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तिच्या प्रशिक्षकांना ३० लाख रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. येत्या शनिवारी नागपूरमध्ये तिचा सत्कार केला जाणार आहे. भारताच्या कोनेरु हंपीला अंतिम फेरीत परा...

July 31, 2025 3:26 PM July 31, 2025 3:26 PM

views 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसामूळे वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आणि भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४९५ मि   लिमीटर पावसाची नोंद झाली असून ४० बंधारे पाण्याखाली आहेत, त्यामुळे या मार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.   धरणक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून राधानगरी धरणा...

July 31, 2025 2:39 PM July 31, 2025 2:39 PM

views 9

मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसात सुमारे ८ कोटी रुपये किंमतीची ८ किलो अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी   दोन वेगवेगळ्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे.   बँकॉकहून आलेल्या दोन वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली. एका प्रकरणात तीन प्रवाशांकडून...