प्रादेशिक बातम्या

October 3, 2025 9:11 PM October 3, 2025 9:11 PM

views 43

सायबर फसवणूक टाळण्यासाठी तातडीनं तक्रार देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

अपघातात ज्याप्रमाणे वेळेवर उपचार मिळाले तर अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात त्याप्रमाणे सायबर फसवणुकीत तातडीने तक्रार दिल्यास फायदा होऊ शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते आज मुंबईत सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. सध्या डिजिटल अटक, आर्थिक फसवणूक, ...

October 3, 2025 9:11 PM October 3, 2025 9:11 PM

views 26

सिंधुदुर्गमध्ये समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू, चौघांचा शोध सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा वेळाघर इथल्या समुद्रात आज आठ पर्यटक बुडाले. आज संध्याकाळी चारच्या सुमाराला ही घटना घडली. यापैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एकाला वाचवण्यात यश आलं आहे. पण उपचार करताना त्याचीही मृत्यू झाला. उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे. यातले काहीजण कुडाळ आणि बेळगावचे असून पाण्याचा...

October 3, 2025 3:22 PM October 3, 2025 3:22 PM

views 279

विष्णूदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर

सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीचा विष्णूदास भावे पुरस्कार ख्यातनाम अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली.

October 3, 2025 9:36 AM October 3, 2025 9:36 AM

views 27

‘ऊसाच्या FRP सोबत साखरेची MSP जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल’

ऊसाच्या एफआरपीसोबत साखरेची एमएसपी जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं व्यक्त केलं.   मुंबईमध्ये नुकत्याच मंत्री समितीच्या बैठकीत साखर उद्योगासंदर्भातील विविध प्रश्नांवर झा...

October 3, 2025 9:36 AM October 3, 2025 9:36 AM

views 36

नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव, जाणून घ्या काय आहेत दर?

विजयादशमीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तसंच खारीफाटा इथल्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च 5 हजार 555 रुपये, तर उमराणे बाजार समितीत सर्वोच्च ...

October 2, 2025 6:36 PM October 2, 2025 6:36 PM

views 19

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची सेवाग्राममध्ये सांगता

दीक्षाभूमीपासून सुरू झालेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेची आज सेवाग्राममध्ये सांगता झाली. हा देश सर्वांचा आहे, शोषित, पीडित, मागास समाजाचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारे संविधान आहे म्हणून संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, असं काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. या या...

October 2, 2025 6:16 PM October 2, 2025 6:16 PM

views 197

प्रवाशांच्या सोयीसाठी ‘आपली एसटी’ या नावानं एसटीचं नवीन ॲप

एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी या नावानं नवीन ॲप आणलं आहे. ते आजपासून लोकांना उपलब्ध होत असून या प्रारंभीच्या टप्प्यात काही त्रुटी दिसून आल्या तर, प्रवाशांनी त्याबाबत जरुर सूचना कराव्यात, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.   

October 2, 2025 3:54 PM October 2, 2025 3:54 PM

views 63

कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी ५ टक्के

वस्तु आणि सेवा कररचनेतल्या सुधारणांमुळे कृषी यंत्रसामग्रीवरचा जीएसटी कमी करून १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे. जैव-कीटकनाशकं तुषार सिंचन, ठिबक सिंचन प्रणाणी, कापणीसाठीची यंत्र, लहान आकाराचं डिझेल इंजिन यांचा त्यात समावेश आहे. अमोनिया, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड यांसारख्या खतांवरचा जीएसटी १८...

October 2, 2025 3:47 PM October 2, 2025 3:47 PM

views 50

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं निधन

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९४२ च्या चले जाव चळवळीत जी जी पारेख यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर आणीबाणीविरोधी आंदोलनातही पारेख यांना कारावास झाला होता. युसूफ मेहरअली सेंटरच्या माध्य...

October 2, 2025 6:10 PM October 2, 2025 6:10 PM

views 105

बीड जिल्ह्यात सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं – पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेलं जातीपातीचं राजकारण संपवावं असं आवाहन मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. बीड जिल्ह्यातील सावरगाव इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. संत भगवान बाबा यांनी सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र राहण्याची शिकवण दिली, तसंच गोपीनाथ मुंडे यां...