प्रादेशिक बातम्या

June 18, 2024 6:46 PM June 18, 2024 6:46 PM

views 13

खेळांना महत्व प्राप्त व्हावं यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीनं राष्ट्रीय क्रीडा संहितेचं काटेकोर पालन करत राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी, तसंच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार...

June 18, 2024 6:48 PM June 18, 2024 6:48 PM

views 8

राज्य पोलीस दलातल्या १७ हजारांहून अधिक पदांसाठी उद्यापासून मैदानी चाचणी

राज्य पोलीस दलातल्या १७ हजारांहून अधिक पदांसाठी उद्यापासून मैदानी चाचणी सुरू होणार आहे. यात पोलीस शिपाई, चालक, बँडवादक, तुरुंग विभाग शिपाई अशा पदांचा समावेश आहे. यात उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. या परिस्थितीत मैदानी चाचणी एकाच दिवशी असेल तर उमेदवारांना ४ दिवसांच्या अंत...

June 18, 2024 5:39 PM June 18, 2024 5:39 PM

views 14

खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यास सुरुवात

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्याची सुरुवात आज झाली. शेतकऱ्यांना यावर्षी देखील पीक विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया द्यावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. विमा काढण्याची अंतिम मुदत १५ जुलै असून  शेतकऱ्यांनी त्यापूर्वी  पीक विमा भरून घ...

June 18, 2024 3:54 PM June 18, 2024 3:54 PM

views 18

कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात मोर्चा

कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रास्तवित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मार्गासाठी संपादित करण्यात आलेली बहुतांश जमीन बागायती असून या महामार्गामुळे परिसरातल्या पर्यावरण आणि जैवविविधतेचा ऱ्हास होईल या कारणामुळे कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातले शेतकर...

June 18, 2024 7:10 PM June 18, 2024 7:10 PM

views 11

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांची सेबीकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात आलेल्या तेजीप्रकरणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज सेबीकडे तक्रार केली. हे एक्झिट पोल राजकीय हेतूने प्रेरित होते, त्यांनी शेअर बाजारात हस्तक्षेप केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, सागरिका घोष, साकेत गोखले आणि शिवसेना उद्ध...

June 18, 2024 11:49 AM June 18, 2024 11:49 AM

views 21

राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागातल्या रिक्त पदांसाठी उद्यापासून भरती प्रक्रिया

राज्यात विविध जिल्ह्यांत पोलिस विभागात रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे साडे सातशे, परभणीत १४१ तर जालना पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या १०२ आणि चालक पदाच्या २३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होईल. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी ...

June 18, 2024 11:23 AM June 18, 2024 11:23 AM

views 18

बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा

बकरी ईदचा सण काल सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात काल म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रक...

June 17, 2024 7:32 PM June 17, 2024 7:32 PM

views 13

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार क...

June 17, 2024 7:28 PM June 17, 2024 7:28 PM

views 12

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्र्यांकडे करणार – मंत्री छगन भुजबळ

समता परिषदेची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जातिनिहाय जनगणना केल्यावर ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे केंद्राकडून निधी मिळेल, असं भुजबळ म्हणा...

June 17, 2024 7:25 PM June 17, 2024 7:25 PM

views 7

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील’

राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात झालेल्या आढावा बैठकीत दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा विकास सोसायटीच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं प्रस्ताव सादर करावेत, पात्र शेतकऱ्य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.