प्रादेशिक बातम्या

July 16, 2024 7:25 PM

views 27

येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे पाऊस

गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त ...

July 16, 2024 7:22 PM

views 38

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उत्तररात्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीचच्या सुमाराला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्...

July 16, 2024 7:08 PM

views 34

मुंबई- पुणे महामार्गावर बस अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या बस अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ४५ प्रवाशांना कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ७ जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळल...

July 16, 2024 6:41 PM

views 18

शिर्डीतील साईबाबा मंदिराला सुरक्षा पुरवण्याबाबत समिती स्थापन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

शिर्डी इथल्या साईबाबा मंदिराला सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा सीआयएफएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा पुरवण्याबाबत शिफारस करण्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्याचे निवृत्त मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. ३...

July 16, 2024 6:34 PM

views 29

नांदेड जिल्ह्यात जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातल्या  सर्वच जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत, तसंच या योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मंत्रालयातल्या समिती कक्षात न...

July 16, 2024 6:29 PM

views 34

वंचित बहुजन आघाडीची २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा

ओबीसी आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी येत्या २५ जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुंबईत चैत्यभूमी इथून या यात्रेला सुरुवात होणार असून विदर्भ, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून या यात्रे...

July 16, 2024 3:48 PM

views 21

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे- रामदास आठवले

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे; प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातलं कौशल्य असणं आवश्यक आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल संगितलं. जागतिक कौशल्य दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कौशल्य आणि व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे विविध क्षेत्रातील प्रशिक्षणार्थींना त...

July 16, 2024 3:47 PM

views 24

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१ जुलैला भाजपाचं व्यापक अधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी, 21 तारखेला भाजपाच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांचं व्यापक अधिवेशन पुण्यात होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातले सर्व केंद...

July 16, 2024 3:07 PM

views 35

शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत येत्या 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.या योजनेची अंतिम मुदत कालपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत होती.   मात्र,राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा भरलेला नाही; त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री ध...

July 16, 2024 12:46 PM

views 23

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मराठवाड्यातून लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचे निकष आता अधिक सोपे करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास कार्यालयातल्या या योजनेच्या समन्वयक सुवर्णा जाधव यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. जाधव यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.