प्रादेशिक बातम्या

July 9, 2024 3:48 PM July 9, 2024 3:48 PM

views 12

राज्यातल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती

राज्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत धोरणाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यात अशा खेळाडूंना प्रामुख्यानं क्रीडा विभागात नियुक्ती देण्याच्या दृष्टीनं त्यांच्या क्रीडा अर्हतेमधे बदल केले आहेत. त्यानुसार ऑलिंपिक क्रीडा स्प...

July 9, 2024 3:31 PM July 9, 2024 3:31 PM

views 12

नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी समिती स्थापन

राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातल्या अन्य विषयांबाबत शिफारशी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल येत्या २५ तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्...

July 9, 2024 3:22 PM July 9, 2024 3:22 PM

views 15

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधानपरिषदे एकमतानं मंजूर

मुंबईतल्या रेल्वेमार्गांवरच्या विविध स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेनं आज एकमतानं मंजूर केला. मध्य रेल्वेमार्गावरच्या करी रोड स्थानकाचं नाव लालबाग स्थानक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवरच्या सॅन्डहर्स्ट स्थानकाचं नाव डोंगरी स्थानक, पश्चिम रेल्वेमार्गाव...

July 9, 2024 2:46 PM July 9, 2024 2:46 PM

views 11

विधानपरिषदेत झाला सभागृहाच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी

विधानपरिषदेच्या नियमित सत्रात आज सभागृहाच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर दराडे यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आमदारकीची शपथ दिली. राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभा...

July 9, 2024 3:41 PM July 9, 2024 3:41 PM

views 11

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाला जनतेकडून देणगी स्वीकारता येणार

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून देणगी स्वीकारण्याची राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षानं केलेली मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सुळे यांच्या नेतृत्वाखाल...

July 9, 2024 2:08 PM July 9, 2024 2:08 PM

views 8

महाराष्ट्रात पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रणासाठी वेगळा कायदा करण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सुनील राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या स्वतंत्र कायद्यात दरावर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी, फौजदारी कारवाई ...

July 9, 2024 7:10 PM July 9, 2024 7:10 PM

views 14

मुंबईत पावसाची विश्रांती

राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसानं आज विश्रांती घेतली आहे.  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या ३ दिवसांपासून  कोसळणाऱ्या पावसाचा जोर काल रात्रीपासून कमी झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असला तरी पुढचे दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. रविवारी झालेल्या अतिवृष्टीत ७१ कुट...

July 8, 2024 7:03 PM July 8, 2024 7:03 PM

views 15

वरळी हिट अँड रन प्रकरण : राजेश शहा यांना जामीन मंजूर

मुंबईच्या वरळी भागात झालेल्या बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याचे वडील आणि शिवसेना नेते राजेश शहा यांना मुंबईतल्या एका न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मिहीर शहा अद्याप फरार आहे. मिहीर याने रविवारी सकाळी बीएमडब्ल्यू चालवताना एका जोडप्याच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघाता...

July 8, 2024 6:58 PM July 8, 2024 6:58 PM

views 5

राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला.  कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. शहरात आज दुपारी पावसानं विश्रान्ती घेतली होती मात्र संध्याकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. परिणामी पंचगंगा नदीचं पात्र फुगलं आहे. राजाराम बंधारा ३० फुटांवर असून नदीची इशारा पातळी ३९ आहे. जिल्ह्यातील ५७ बंधारे पाण्याखाली ...

July 8, 2024 6:43 PM July 8, 2024 6:43 PM

views 15

मुंबईत गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला सर्वाधिक पाऊस

मुंबई महानगर क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं सर्वत्र दाणादाण उडवली. सांताक्रुझ वेधशाळेत नोंद झालेला गेल्या ५ वर्षातल्या जुलै महिन्यातला एका दिवसातला हा सर्वाधिक पाऊस आहे. हवामान विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार आज सकाळी साडे ८ पर्यंतच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात २६७ मिलिमीटर पाऊस ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.