प्रादेशिक बातम्या

July 10, 2024 3:40 PM July 10, 2024 3:40 PM

views 14

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्...

July 10, 2024 9:18 AM July 10, 2024 9:18 AM

views 7

राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार – वैद्यकीय शिक्षणंत्री हसन मुश्रीफ

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात हिंगोली आणि जालन्यासह राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेची ही महाविद्यालयं सुरु करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यक परिषदेकडे अर्ज देण्य...

July 10, 2024 9:14 AM July 10, 2024 9:14 AM

views 6

राज्यसरकार कुठल्याही समाजघटकांवर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली ...

July 9, 2024 7:50 PM July 9, 2024 7:50 PM

views 10

सर्वपक्षीय बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आज मुंबईत सर्वपक्षीय मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या प्रकरणी राज्य सरकारनं विरोधकांना विश्वासात न घेतल्यानं महाविकास आघाडी बैठकीला जाणार नाही. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनते...

July 9, 2024 7:15 PM July 9, 2024 7:15 PM

views 8

म्हाडा मुंबई मंडळाच्या १७६ अनिवासी गाळे ई-लिलावातल्या यशस्वी अर्जदारांना १० जुलैपासून तात्पुरतं देकारपत्र देण्यात येणार

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध वसाहतींमधल्या १७६ व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी राबवलेल्या ई-लिलावातल्या यशस्वी अर्जदारांना उद्यापासून, म्हणजे १० जुलैपासून तात्पुरतं देकारपत्र देण्यात येणार आहे. तसंच बोलीच्या १० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्यासाठी अर्जदारांना ना-हरकत...

July 9, 2024 7:07 PM July 9, 2024 7:07 PM

views 12

विनियोजन विधेयक विधिमंडळात मंजूर

विनियोजन विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. त्यापूर्वी महसूल, वनं, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, तसंच महिला आणि बालविकास विभागाच्या मागण्या विधानसभेनं मंजूर केल्या. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विनियोजन विधेयक मांडलं. त्यावर बोलताना, हे सरकार अस्तित्वात असताना दोन - दोन वेळा अर्थसंकल्प सादर करण्...

July 9, 2024 7:04 PM July 9, 2024 7:04 PM

views 8

उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड येत्या ११ तारखेला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं यासंदर्भातलं निमंत्रण उपराष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. देशाची  लोकशाही मूल्यं आणि नीतिमत्...

July 9, 2024 6:35 PM July 9, 2024 6:35 PM

views 14

९४ हजार ८८९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर

राज्याचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर अवघ्या काही मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकंदर ९४ हजार ८८९ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विक्रमी पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. यामध्ये, याच अतिरिक्त अर्थसंकल्पात मांडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. सर्...

July 9, 2024 6:53 PM July 9, 2024 6:53 PM

views 14

वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला अटक

वरळी इथं रविवारी झालेल्या हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी आज अटक केली. यावेळी त्याची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मिहिरी याच्या गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती जखमी झाले होते...

July 9, 2024 5:06 PM July 9, 2024 5:06 PM

views 12

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मागण्यांचं निवेदन केलं सादर

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केलं. विधानपरिषदेचं सभापती पद हे गेले अडीच वर्ष रिक्त आहे. विधान परिषदेच्या सभापती पदासारखं संवैधानिक पद रिक्त असणं लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीसाठी याच अधिवेशनात तारीख जाहीर ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.