प्रादेशिक बातम्या

August 1, 2024 8:42 AM

views 11

डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा सरकारचा निर्णय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात, शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड झाली असून, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोट...

July 31, 2024 8:19 PM

views 16

राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारकडून १,९०० कोटी रुपये मंजूर

राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं १ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याला लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं आज राज्य सरकारला हस्तांतरित केले.

July 31, 2024 7:25 PM

views 21

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ

राज्यात विविध ठिकाणी नद्यांच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधे पाणीसाठा वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून ६०९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा धर...

July 31, 2024 7:08 PM

views 27

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com...

July 31, 2024 7:04 PM

views 20

महाराष्ट्र शासनाचा टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार

राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर इथं टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे भारतातल्या मोटार वाहन...

July 31, 2024 6:56 PM

views 23

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली. मुंबईत राजभवनात आयोजित समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजीत पवार यांनी र...

July 31, 2024 8:40 PM

views 25

जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत. जपानने भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.   जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत...

July 31, 2024 6:48 PM

views 25

राज्यात एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज, अहमदनगर जिल्यातलं लिंगदेव, नाशिक जिल्ह्यातलं कळवण-सुरगणा, जांबुटके आणि अमरावती जिल्ह्यातलं वरुड इथं एमआयडीसी उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसंच राज्यात यापुढे एमआयडीसी उभारण्यासाठी किमान शंभर एकर जमीनीची उप...

July 31, 2024 3:29 PM

views 16

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला ...

July 31, 2024 3:25 PM

views 26

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद

सांगली जिल्ह्यातल्या वारणा धरणात आज सकाळी २९ पूर्णांक २५ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद झाली असून ३४ पूर्णांक ४० टीएमसी इतकी या धरणाची साठवण क्षमता आहे. कोयना धरणातून ४२ हजार १०० क्यूसेक इतका, वारणा धरणातून ८ हजार ९२ हजार क्यूसेक तर अलमट्टी धरणातून ३ लाख ५० हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती जल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.