प्रादेशिक बातम्या

July 30, 2024 7:23 PM

views 21

८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मंजुरी

उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीनं राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार ...

July 30, 2024 8:56 PM

views 14

सरकारी वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ

राज्यातली विविध विभागांची वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. आदिम जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना राबवण्यासह आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीच...

July 30, 2024 7:25 PM

views 22

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरका...

July 30, 2024 3:34 PM

views 35

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे ५०० घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका आदी नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ३ हजार ३८९ जणांना स्थलांतरित केलं असून शासनाकडून त्यांना सर्व ...

July 30, 2024 3:19 PM

views 17

‘आदिवासी शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहकार विभागानं प्रस्ताव सादर करावा’

राज्यातल्या आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या विविध योजनांचे लाभ मिळत नाहीत. त्यांना या योजनांचे लाभ मिळावेत म्हणून आदिवासी विभाग तसंच सहकार विभागानं सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजि...

July 30, 2024 8:37 PM

views 33

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप

राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज निरोप देण्यात आला. राजभवनात झालेल्या या निरोप सभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, तसंच राजभवनातले अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.       नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ उद्य...

July 30, 2024 2:55 PM

views 24

नवी मुंबई इथं घडलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात दाऊद शेख याला अटक

नवी मुंबई इथं घडलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात फरार आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकात अटक करण्यात आली. त्याच्यासह अन्य एकालाही अटक करण्यात आली आहे. २७ जुलै रोजी उरण इथं निर्जन ठिकाणी एका तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह सापडला होता.

July 30, 2024 12:49 PM

views 12

स्वीकृती प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शर्मा यांच्या मुली  अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्...

July 29, 2024 7:53 PM

views 20

मुंबई महानगरपालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने यावर्षी सहा हजार कोटींच्या निविदा काढल्या, मात्र गेल्यावर्षी निविदा काढलेलं एकही काम झालेलं नसून पालिका पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मागच्या वर्षी निविदा काढलेली कि...

July 29, 2024 7:50 PM

views 34

मुंबईची जिया राय ठरली जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू

मुंबईची जिया राय, इंग्लिश खाडी सर्वात कमी वेळात पार करणारी जगातली सर्वात कमी वयाची दिव्यांग जलतरणपटू ठरली आहे. जिया हिनं हे ३४ किलोमीटरचं अंतर २८ आणि २९ जुलैदरम्यान १७ तास, २५ मिनिटांमध्ये पार केलं.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.