प्रादेशिक बातम्या

July 17, 2024 6:27 PM July 17, 2024 6:27 PM

views 15

राज्यात सर्वत्र आषाढी एकादशीचा उस्ताह

राज्यात विविध ठिकाणी आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.      परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय शाळेत आषाढीनिमित्त...

July 17, 2024 3:51 PM July 17, 2024 3:51 PM

views 10

दूध प्रक्रिया केंद्रांनी २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातला अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समुह तसंच इतर प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचं संकलन करावं असं आवाहन, दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रीया केंद्राच्‍या प्रमुखांच्...

July 17, 2024 3:26 PM July 17, 2024 3:26 PM

views 15

गडचिरोली जिल्हा भविष्यात राज्यातला अग्रेसर जिल्हा असेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते गडचिरोली इथं झालं त्यावेळी ते बोलत होते. अहेरी ता...

July 17, 2024 3:21 PM July 17, 2024 3:21 PM

views 10

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक

रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत रायगड जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या रुपये ४३२ कोटी, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत २८ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४१ कोटी ६१ लक्ष अशा एकूण ५०१ कोटी ६१ लक्ष रुपयांच्या...

July 17, 2024 3:10 PM July 17, 2024 3:10 PM

views 14

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १३ किलोपेक्षा जास्त सोनं जप्त

सीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सुमारे सव्वातेरा किलो वजनाचं सोनं, एक कोटी ३८ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक उपकरणं, आणि सुमारे ४५ लाख रुपये मूल्याचं परकीय चलन जप्त केलं आहे.   १० ते १४ जुलैदरम्यान २४ वेगवेगळ्या प्रकरणांमधे ही जप्ती झाली असून सात जण...

July 17, 2024 10:08 AM July 17, 2024 10:08 AM

views 11

वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण स्थगित

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीनं जारी केला आहे.   तसंच पुढील कार्यवाहीसाठी त्यांना 23 जुलैपूर्वी मसूरी इथं अकादमीत बोलवण्यात आलं आहे. अकादमीनं महाराष्ट्र शासनाला यासंदर्भात पत्र पाठवलं आ...

July 16, 2024 8:15 PM July 16, 2024 8:15 PM

views 11

मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव करण्यात आला. यावर्षी कझाकस्तान इथं झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत मुंबईतल्या वेदांत साक्रे याने सुवर्ण, रत्नागिरीतल्या ईशान पेडणेकरसह चेन्नईच्या श्रीजीथ शिवक...

July 16, 2024 7:25 PM July 16, 2024 7:25 PM

views 18

येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे पाऊस

गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त ...

July 16, 2024 7:22 PM July 16, 2024 7:22 PM

views 21

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उत्तररात्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीचच्या सुमाराला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे. यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्...

July 16, 2024 7:08 PM July 16, 2024 7:08 PM

views 15

मुंबई- पुणे महामार्गावर बस अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या बस अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ४५ प्रवाशांना कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ७ जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळल...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.