प्रादेशिक बातम्या

July 18, 2024 7:21 PM July 18, 2024 7:21 PM

views 11

मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. एका शेतकऱ्याला बंदूक रोखू...

July 18, 2024 3:55 PM July 18, 2024 3:55 PM

views 9

धुळ्यात ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानास प्रारंभ

धुळे वनविभागच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मा के नाम’ आणि ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ अभियानातर्ंगत वनविभाग तसेच रोहयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिसरण पद्धतीने धुळे तालुक्यातील सांजोरी गावात २२ हेक्टरवर वृक्षारोपण कार्यक्रम आज राबवण्यात आला.     या वृक्षलागवडीस...

July 18, 2024 3:47 PM July 18, 2024 3:47 PM

views 14

राज्यात विविध भागात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागांत पावसानं जोर धरला आहे. मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली.  शहरातले रस्ते आणि पुलांवर पाणी साचल्यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी दिसून आली, मात्र सर्व उपनगरी रेल्वे मार्गांवरची सेवा सुरळीत सुरु आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारपासून पावसानं पुन...

July 18, 2024 3:42 PM July 18, 2024 3:42 PM

views 15

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तसंच कोकणात  बहुतांश  ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  कोकण  किनारपट्टीवर जोरदार  वारा वाहण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

July 18, 2024 3:37 PM July 18, 2024 3:37 PM

views 17

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला  होता. तेव्हापासून मनोरमा  फरार होत्या.

July 18, 2024 3:26 PM July 18, 2024 3:26 PM

views 14

विधानसभा निवडणूक : नांदेडमध्ये २५ जुलैला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या २५ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या यादीत आपलं नाव नसेल तर ते समाविष्ट करण्यासाठी मतदारांना ९ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मतदार या कालावधीत यादीतल्या नावांमध्ये दुरुस्ती, पत्त्यामध्ये ब...

July 18, 2024 3:19 PM July 18, 2024 3:19 PM

views 10

विशाळगडावरी घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं – विजय वडेट्टीवार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान समाजकंटकांनी घातलेला हैदोस निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रकरण घडलं. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावं, तसंच नुकसानग्रस्तांना सरकारनं मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरो...

July 18, 2024 5:33 PM July 18, 2024 5:33 PM

views 9

गडचिरोलीत पोलिसांबरोबरच्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या जारावंडी क्षेत्रांतर्गत छत्तीसगड सीमेलगतच्या वांडोली नजीकच्या जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत १२ नक्षली ठार झाले. त्यात ७ पुरुष आणि २ महिलांचा समावेश असून, सर्वांची ओळख पटली आहे.   या १२ जणांवर मिळून ३० लाख रुपयांचं बक्षीस होतं. या कारवाईमुळे उत्तर गडच...

July 18, 2024 11:59 AM July 18, 2024 11:59 AM

views 12

राज्‍यात दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावे-राधाकृष्‍ण विखे पाटील

राज्‍यातल्या अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडवण्‍यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचं संकलन करावं, असं आवाहन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केलं आहे. काल मुंबईत, दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीत ...

July 18, 2024 11:49 AM July 18, 2024 11:49 AM

views 13

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी होणार

वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याच्या तक्रारीवरून ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तुल ...