प्रादेशिक बातम्या

September 30, 2024 12:50 PM September 30, 2024 12:50 PM

views 9

नेपाळमध्ये पावसाचा कहर, विविध घटनांमध्ये १३२ नागरिकांचा मृत्यू

नेपाळमध्ये संततधार पावसाने  कहर केला आहे.  पावसामुळे पूर आणि दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गीक संकटांमध्ये एकूण १३२ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती नेपाळ गृहमंत्रालयाने दिली आहे. पूरपरिस्थितीमुळे काठमांडू दरी भागात ६८जण, बागमतीमध्ये ४५ ,कोशीत सतराजण तर मधेश परगण्यात दोन जणांचा मृत्यू झाला. सैन्यदलाच्या म...

September 30, 2024 8:53 AM September 30, 2024 8:53 AM

views 4

राज्यात मविआचं सरकार येईल, वडेट्टीवारांचा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं काँग्रेस मेळाव्यात ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या लडाकी बहिण योजनेवर टीका केली.

September 30, 2024 8:13 AM September 30, 2024 8:13 AM

views 6

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते

शेतकऱ्यांच्या यशोगाथेतूनच समाज, राज्य आणि देश उभा राहतो, त्यांच्याशिवाय देशाला भविष्य नाही, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. वर्ष २०२० ते २०२२साठीच्या एकंदर ४४८ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महा...

September 29, 2024 5:13 PM September 29, 2024 5:13 PM

views 11

विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची १२ जागांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतले तीन प्रमुख पक्ष इतर समविचारी पक्षांचा विचार न करता आपसातच जागावाटपाची चर्चा करत असल्याची नाराजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी माकपनं केवळ १२ जागांची मागणी केला आहे. इतर पक्षांनीही मर्यादित जागांची मागणी केली आहे. प...

September 29, 2024 3:50 PM September 29, 2024 3:50 PM

views 3

शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण

शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्या अनुषंगानं, ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा प्रारंभ उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईच्या कुर्ला इंथल्या शा...

September 29, 2024 3:46 PM September 29, 2024 3:46 PM

views 10

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमीपूजन

साताऱ्यात पाटण विधानसभा मतदारसंघातल्या विविध कामांचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई बहुद्देशिय कृषी संकुलाचं उद्घाटन  आणि  नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या पाणी योजनेचं भूमीपूजन याचा यात समावेश आहे. त्यानंतर नाडे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

September 29, 2024 3:38 PM September 29, 2024 3:38 PM

views 13

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो ...

September 29, 2024 10:18 AM September 29, 2024 10:18 AM

views 6

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज पुण्यातल्या स्वारगेट-सिविल कोर्ट मेट्रोचं आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या ११ हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामाचं उद्घघाटन, भूमीपूजन करणार आहेत. यावेळी पुण्यातल्या स्वारगेट ते सिवील कोर्ट या भुयारी मेट्रोचंही उद्घघाटन करतील. त्यांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमीपुजन आणि पुण्यातल...

September 28, 2024 7:44 PM September 28, 2024 7:44 PM

views 4

महिलांनी खंबीर व्हायला हवं – एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव

महिलांनी खंबीर व्हायला हवं असं मत  एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केलं आहे. त्या नवी मुंबईच्या सानपाडा  इथं आज झालेल्या एक दिवसीय महिला साहित्यिक संमेलनात बोलत होत्या.   अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत या संमेलनात महिला साहित्यिकांचे विविध परिसंवाद, चर्चासत्रं आणि...

September 28, 2024 7:26 PM September 28, 2024 7:26 PM

views 8

मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा – भूषण गगराणी

मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात आयुक्त गगराणी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.