प्रादेशिक बातम्या

December 15, 2024 7:28 PM

views 28

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राला पुढे नेणं हेच महायुतीचं ध्येय आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर महामंडळाची पदं तात्काळ भरली जातील,  असं ते म्हणाले.  &nbs...

December 15, 2024 8:41 PM

views 51

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आज ३३ कॅबीनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. नागपूर इथं राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि  गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. महायुतीच्या मागील सरकारच्या कार...

December 15, 2024 8:42 PM

views 38

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्रीपदाची संधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यामुळे इतर आमदारांना संधी...

December 15, 2024 8:41 PM

views 31

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाचा बहिष्कार

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला आहे.    महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज नागपुरात बैठक झाली, त्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षांन...

December 15, 2024 3:24 PM

views 31

पालघर जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती सप्ताहाचं आयोजन

पालघर जिल्ह्यात ११ डिसेंबर पासून सुरु झालेला सिकलसेल जनजागृती सप्ताह येत्या १७ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. जिल्ह्यात २००९ पासून जवळपास १३ लाख ९६ हजार ३५३ इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करणात आल्या आहेत. त्यात २४ हजार २२८ वाहक आणि १ हजार ६०६ सिकलसेलने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोफ...

December 15, 2024 3:14 PM

views 26

सोलापुरात राष्ट्रीय लोकअदालतीत १९,८३१ प्रकरणे निकाली

सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १९ हजार ८३१ प्रकरणं सामंजस्यानं निकाली लागली. लोकअदालतीच्या माध्यमातून १० जोडप्यांचं वैवाहिक आयुष्य पुन्हा मार्गी लागलं तर काही आर्थिक प्रकरणात सुमारे ७१ कोटी ५ लाख १४ हजार ६०५ रुपयांची तडजोड करून वाद मिटवण्यात यश आलं. ही लोक अदालत यशस्वी होण्...

December 15, 2024 6:20 PM

views 23

नागपुरात राज्यातल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

महाराष्ट्रतल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मं...

December 15, 2024 1:40 PM

views 9

उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या २ ते ३ दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आजही मध्य प्रदेशातील काही भागात जोरदार थंडीची लाट कायम राहू शकते असंही सांगितलं. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या काही भागांमध्ये पुढील २ द...

December 15, 2024 3:07 PM

views 41

रत्नागिरीत जयगडमधल्या वायुगळतीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमधल्या वायुगळतीच्या प्रकरणात जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड कंपनीच्या चौघांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायुगळतीचं कारण शोधण्यासाठी मुंबई किंवा पुण्यातून तज्ज्ञांना बोलावलं जाणार आहे. दरम्यान, आणखी ३३ मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून, सात मुलांवर...

December 15, 2024 9:35 AM

views 15

जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसच्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू

जालना-सिंदखेडराजा मार्गावर आयशर ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १८ ते २० प्रवासी जखमी झाले. नाशिक-नांदगाव डेपोची ही बस जालन्याहून सिंदखेडराजाकडे जात असताना, नाव्हा शिवारात ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.