प्रादेशिक बातम्या

December 16, 2024 3:37 PM

views 25

गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं निधन

संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे पुत्र, गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय मराठे यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता.

December 16, 2024 3:45 PM

views 27

विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर मंत्र...

December 16, 2024 3:47 PM

views 23

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसैन यांना ५ ग्रॅमी पुर...

December 16, 2024 3:06 PM

views 34

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.    त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं...

December 16, 2024 10:31 AM

views 17

गडचिरोलीत पोलिसांनी शोधली नक्षल्यांनी जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत, करंचा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटकं शिताफीने बाहेर काढून ती नष्ट करण्यात आली. जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श...

December 16, 2024 10:30 AM

views 82

हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १४ डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेद...

December 16, 2024 9:38 AM

views 31

हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच, हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्...

December 16, 2024 12:28 PM

views 123

नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्...

December 15, 2024 7:38 PM

views 660

येत्या दोन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता

गेल्या चोवीस तासात, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय तर किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं ६ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.    येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता प...

December 15, 2024 7:29 PM

views 52

स्त्री मुक्ती संघटनेच्या स्थापनेला ५० वर्षं पूर्ण

स्त्रियांना समाजात समान स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं सुरू झालेली स्त्री मुक्ती संघटना ५०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईत आज दिवसभर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या ५० वर्षांत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेले बदल आणि स्त्री चळवळीच्या वाटचा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.