प्रादेशिक बातम्या

December 18, 2024 7:24 PM

views 24

विधानपरिषदेच्या सभापतीपदी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांची निवड होण्याचा मार्ग मोकळा

राज्य विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजेपर्यंत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

December 18, 2024 8:43 AM

views 71

नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ योजना योजना सुरू

ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, या उद्देशानं राज्य शासनानं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात १ हजार १०० कामं मंजूर असून ही कामं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

December 18, 2024 8:35 AM

views 36

धाराशिवमध्ये ‘नई चेतना’ अभियानांतर्गत ‘लिंगभेद समानता’ विषयावर जनजागृती

धाराशिव जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ‘नई चेतना’ या अभियानाअंतर्गत ‘लिंगभेद समानता’ या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये मुलगा मुलगी एक समान, बालविवाह प्रतिबंध करणे, महिलाविषयक अन्याय अत्याचार हिंसाचार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन, तसेच हुंडाबंदी, बालविवाह बंदी या सामाजिक व...

December 17, 2024 8:35 PM

views 109

मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद

विकसित भारतासमोरच्या आव्हानांची चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद पार पडली. यावेळी विकसित भारतासमोरची आव्हानं, त्यांना मिळणारं अर्थसहाय्य, या अर्थसहाय्याचं स्त्रोत याविषयी चर्चा झाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी दिली. या चर्चांचा उपयो...

December 17, 2024 8:34 PM

views 26

विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" योजनेंतर्गत महिलांना देण्यात आलेली रक्कम अत्यंत कमी असून त्यात किती रुपयांची वाढ केली जाणार,  आसा प्रश्न विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेत बोलत होते.    राज्यात "जल जीवन मिशन योजना" राबवताना अने...

December 17, 2024 7:50 PM

views 83

MPSC 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

एम.पी.एस.सी. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष  २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं  अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं  प्रसिध...

December 17, 2024 7:41 PM

views 39

पुण्यात ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू

जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. येत्या २२डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.

December 17, 2024 7:42 PM

views 10

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य

नागपूरमधल्ये मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५४७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विक...

December 17, 2024 6:23 PM

views 30

उद्धव ठाकरे यांची नागपुरात विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यां...

December 17, 2024 5:38 PM

views 16

पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

पत्र लिहिणं ही एक कला असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही ही कला जोपासायला हवी, यातूनच पुढे उत्तम साहित्यिक घडतील, असं मत ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आज मांडलं. मुंबईच्या जनरल पोस्ट कार्यालयानं आयोजित केलेल्या ‘पत्रोत्सव २०२४’ या कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय डाक विभागाच्या 'ढाई...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.