प्रादेशिक बातम्या

December 22, 2024 3:42 PM

views 27

मच्छिमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्डचा लाभ

मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य  किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात ये...

December 22, 2024 3:24 PM

views 23

राज्यात हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे.    दरम्यान, सूर्याच्या उत्तरायणाला काल २१ डिसेंबरला प्रारंभ झाल...

December 22, 2024 3:19 PM

views 33

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारला

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी काल पदभार स्वीकारला. मस्साजोग हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रलंबित कामं लवकरच पूर्ण केली जातील, असं कॉवत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व...

December 22, 2024 3:09 PM

views 17

पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना ‘महाराष्ट्र’ देशात अग्रेसर – मंत्री अदिती तटकरे

भारत पाच ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील, असं राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात २०२५-२६ च्या प्रस्ता...

December 22, 2024 1:59 PM

views 48

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप काल जाहीर झालं. गृह आणि ऊर्जा खातं तसंच विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क खातं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे य...

December 21, 2024 8:16 PM

views 14

प्रवासी बोटीला झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ वर

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा गुंफांच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी बोटीला १८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ झाली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाला सापडला. या मुलाच्या आईचाही या अपघातात मृत्यू झाला होता. भारतीय नौदलाची बो...

December 21, 2024 8:21 PM

views 5

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून

राज्य विधिमंडळाचं नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. ३ मार्च २०२५ पासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा आज सभागृहासमोर मांडला.    १६ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हिव...

December 21, 2024 7:24 PM

views 30

मार्चपर्यंत राज्याला नक्षलवादमुक्त करण्याचा मानस – एकनाथ शिंदे

राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी महायुतीचं सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली. ते आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते.    महायुतीच्या काळात गुन्हे उघडकीला येण्याचे प्रमाण वाढले, विकास आणि कल्याणकारी...

December 21, 2024 7:33 PM

views 4

अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी कोणतीच चर्चा नाही- नाना पटोले

विदर्भ, मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग...

December 21, 2024 6:47 PM

views 15

सह्याद्री फार्म्समध्ये युरोप आणि अमेरिकेतल्या कंपनीची ३९० कोटींची गुंतवणूक

नाशिक  जिल्ह्यातल्या  सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमीटेड या कंपनीमध्ये युरोपमधल्या रिसपॉन्स अबिलिटी  तसंच   अमेरिकेतल्या जीईएफ कंपनीनं ३९० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा वापर  पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांचे  लागवड क्षेत्र विस्तारण्यासाठी आणि  मूल्यवर्धित उत्पादन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.