प्रादेशिक बातम्या

December 5, 2024 9:21 AM December 5, 2024 9:21 AM

views 31

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार

अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव येत्या ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांचं कीर्तन, अभंगवाणी, संगीत रजनी तसंच भजनासह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

December 5, 2024 9:18 AM December 5, 2024 9:18 AM

views 7

समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनर अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या दोघांचा मृत्यू

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथं कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या बहुजन समाज पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बसपाची समिक्षा बैठक आटोपून ते परतत असताना काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन बनसोडे आणि प्रशांत निकाळजे अशी ...

December 5, 2024 8:26 AM December 5, 2024 8:26 AM

views 112

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे. भाजपाच्या गा...

December 4, 2024 7:24 PM December 4, 2024 7:24 PM

views 10

सिंधुदुर्गात बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून ६१ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ही कारवाई क...

December 4, 2024 7:31 PM December 4, 2024 7:31 PM

views 12

महायुतीचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा

महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस, अजित पवार, आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. याव...

December 4, 2024 8:18 PM December 4, 2024 8:18 PM

views 14

नवं सरकार राज्याच्या प्रगतीसाठी काम करेल – देवेंद्र फडणवीस

महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडनवीस, एकनाथ शिंदे  आणि अजित  पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची माहिती दिली. महायुतीत  आतापर्यंत सर्व निर्णय एकत्रितपणे घेतले गेले असून यापुढेही एकत्र राहून निर्णय घेऊ असं भाजपा विधिमंडळ गट नेते देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांग...

December 4, 2024 3:08 PM December 4, 2024 3:08 PM

views 9

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे तीव्र धक्के

महाराष्ट्रात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळी साडे सातच्या सुमारास भुकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भुकंपाची तीव्रता ५ पूर्णांक ३ दशांश रिक्टर स्केल असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने जाहीर केलं आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, गोदीवरी नदीच्या खोऱ्यात भुकंपाचे ध...

December 4, 2024 3:27 PM December 4, 2024 3:27 PM

views 12

अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांचा आज राज्यसभेतून सभात्याग

अन्नधान्याची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत विरोधकांनी आज राज्यसभेतून सभात्याग केला. आज सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर एमएसपी, फेंजल चक्रिवादळ, संभल हिंसाचार आणि अदानी लाचखोरी प्रकरणावर विरोधी पक्षांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानं...

December 4, 2024 3:24 PM December 4, 2024 3:24 PM

views 17

मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला नव्यानं कर्ज

विकास प्रक्रियेत मदत करण्यासाठी जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने महाराष्ट्राला ३ डिसेंबर रोजी नव्यानं कर्ज मंजुर केलं आहे. राज्यातल्या मागास जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या जागिक बँकेच्या उपक्रमाचा हा भाग आहे. विकासाची संधी निर्माण करणं, खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देणं हे...

December 4, 2024 10:55 AM December 4, 2024 10:55 AM

views 5

भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक

भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी नवनियुक्त आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी निरिक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदान इथं संध्याकाळी 5 वाजता पार पडेल...