प्रादेशिक बातम्या

December 5, 2024 7:13 PM December 5, 2024 7:13 PM

views 14

राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज मात्र पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा गारवा वाढला आहे. थंडीतला पाऊस आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यानी केलं आहे.  सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथंही...

December 5, 2024 8:11 PM December 5, 2024 8:11 PM

views 17

७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विधानसभेचं विशेष अधिवेशन

राज्याला स्थिर आणि लोकाभिमुख सरकार देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्या वेळापूर्वी वार्ताहर परिषदेत दिली. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून राज्यपालांचं अभिभाषण व्हावं, यासाठीची शिफारस राज्यपालांना केली असल्याची माहि...

December 5, 2024 7:20 PM December 5, 2024 7:20 PM

views 10

६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका सज्ज

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांना सुविधा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पालिकेनं चैत्यभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारला असून रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता...

December 5, 2024 8:17 PM December 5, 2024 8:17 PM

रत्नागिरीत उद्यापासून ८ डिसेंबरपर्यंत संगीत कला महोत्सव

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या श्री कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात कलांगण आयोजित तिसरा संगीत कला महोत्सव उद्यापासून ८ डिसेम्बरपर्यंत रंगणार आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालयाच्या सौजन्याने होणाऱ्या या महोत्सवात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिम...

December 5, 2024 10:08 AM December 5, 2024 10:08 AM

views 1

पुणे महापालिका प्रशासनाकडून इंटीलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरू

अधिकाधिक पारदर्शकता आणून गतीनं कामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं इंटीलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. यामुळं एकाच ठिकाणी विविध विभागांची कामं करताना कामांचं नियोजन, दुबार कामं रोखणं यांसह कामाचं पूर्वगणनपत्रक तयार करण्यापासून ते कामाचं देयक देण्यापर्यंतची सर्व काम...

December 5, 2024 10:05 AM December 5, 2024 10:05 AM

views 10

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्याला जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

चंद्रपूर, गडचिरोली तसंच नागपूर जिल्ह्यात काल सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 पूर्णांक 3 रिख्टर होती आणि तेलंगण राज्यातील मुलुगु इथं या भुकंपाचा केंद्रबिंदू होता, असं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं जाहीर केलं आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळं कोणतीही जिवित...

December 5, 2024 10:03 AM December 5, 2024 10:03 AM

views 18

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राज्यात एक ते 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून, दहा डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील 1 लाख 72 हजार मुलांना काल ठिकठि...

December 5, 2024 10:01 AM December 5, 2024 10:01 AM

views 13

बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना घेतलं ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं काल पहाटे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 61 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर झार...

December 5, 2024 9:57 AM December 5, 2024 9:57 AM

views 26

बीड जिल्हा युवा महोत्सवाला प्रारंभ

बीड जिल्हा युवा महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलावर भरलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या हस्ते झालं. या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पनांवरर आधारित स्पर्धा, लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास कार्यक्रम, कथालेखन...

December 5, 2024 9:25 AM December 5, 2024 9:25 AM

views 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं निधन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. बलभीम पाटोदेकर यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. युनायटेड स्टेट्स माहिती सेवेतून त्यांनी मुंबईत अमेरिकी दूतावासात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बीडच्या श्री बंकटस्वामी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून पाटोदेक...